माढा लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर खा. मोहिते-पाटील यांची आढावा बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

माढा लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर खा. मोहिते-पाटील यांची आढावा बैठक

 माढा लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर खा. मोहिते-पाटील यांची आढावा बैठक



अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) आणि पोस्ट ऑफीसशी संबंधित विविध प्रश्नांवर आज अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेतली.
या बैठकीत स्थानिक पातळीवरील समस्या आणि विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान खा. मोहिते-पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सखोल चर्चा केली. रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते बांधणी आणि महामार्गांच्या देखभालीसंदर्भातील तक्रारींची दखल घेत अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. "माढा मतदारसंघातील रस्ते हे विकासाचे प्रमुख साधन आहेत. त्यामुळे NHAI ने कामात गती आणावी," असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत विद्युत पुरवठा आणि वितरण व्यवस्थेच्या सुधारणांवरही चर्चा झाली. ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यातील अडचणी, समस्या याच बरोबर केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रसंगी खासदारांनी ठोस उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.

पोस्ट ऑफीस संदर्भातील समस्यांवरही या बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. पोस्टल सेवांच्या सुधारणेसाठी तसेच ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसच्या सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश खा. मोहिते-पाटील यांनी दिले. "पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत," असे त्यांनी नमूद केले.या बैठकीत खा. मोहिते-पाटील यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

 बैठकीला NHAI, महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाचे आणि पोस्ट ऑफीसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages