29 जून ते 07 जुलै पर्यंत पालखी मार्गावरील वाहतुक मार्ग बदल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज यांनी त्यांचेकडील पत्र जावक 2112 /2025 दिनांक 12 जून 2025अन्वये दि. 29 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी सपंन्न होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 30 जुन 2025 रोजी नातेपुते पोलीस ठाणे हददीत व दिनांक 01 जुलै 2025 रोजी श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलीस ठाणे हददीत प्रवेश करणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव वाखरी मार्गे पंढरपूर कडे येत असते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलुज, श्रीपुर, बोरगांव, तोंडले-बोडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी मार्ग पंढरपूर कडे येत असते, दोन्ही पालखी सोहळयात लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने वारकरी हे पायी पंढरपूर कडे येत असतात. पालखी बरोबर त्यांचे दिंडया व वाहने ही सोबत असतात त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होवु नये याकरीता पालखी सोहळया दरम्यान पालखी सोहळयातील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये दि. 29 जुन 2025 रोजी 00.01 ते 07 जुलै 2025 रोजी 24.00 वाजे पर्यंत अकलुज व पंढरपूर या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखी दिंडयासोबत असणारी वाहने यांचेशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) उपलब्ध असणारे पर्यायी मार्गाचा वापर करावा असा आदेश देत आहे.
मार्ग पुढील प्रमाणे
पंढरपूर कडून पुणे येथे जाणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग - वाखरी-साळमुख फाटा-पिलीव-म्हसवड-फलटण किंवा पंढरपूर-टेंभुर्णी-पुणे
पुणे-फलटण येथुन पंढरपूर कडे येणा-या वाहनांकरीता पर्यायी मार्ग- फलटण-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक-पंढरपूर . किंवा पुणे-टेभुर्णी-पंढरपूर .
वेळापूर येथुन पंढरपूर कडे येणा-या वाहनांकरीता- पर्यायी मार्ग- साळमुख चौक-सातारा रोड-पंढरपूर
सांगोला येथून पुणे कडे जाणा-या वाहनांकरीता (सांगोला येथून पुणेकडे जाणारी जड वाहतुक वगळून) पर्यायी मार्ग - सांगोला-साळमुख चौक वेळापूर-अकलुज-इंदापूर.
पुणे येथुन इंदापूर मार्ग पंढरपूर येथे येणारी वाहने पर्यायी मार्ग- पुणे-टेंभुर्णी-पंढरपूर
अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूर कडे जाणारी वाहने - पर्यायी मार्ग- अकलुज-टेभुर्णी-सोलापूर
सोलापूर येथुन पंढरपूर मार्गे अकलुज कडे जाणारी वाहने- पर्यायी मार्ग- सोलापूर-टेंभुर्णी-अकलुज
सदरचा आदेशाचा अंमल हा दिनांक 29 जुन 2025 रोजी 00.01 वा. पासुन ते 07 जुलै 2025 रोजी 24.00 वा पर्यत अंमलात राहील.
असा आदेश पोलीस अधिक्षक (सोलापूर ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे.
आषाढी यात्रा पंढरपूर जड वाहतुक मार्गात बदल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर आषाढी यात्रे कारणामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रं 2300/2025 दि. 05 जून 2025 अन्वये श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. 30 जून ते 10 जुलै 2025 आषाढी शुध्द पौर्णिमा या कालावधीत आषाढी यात्रा भरणार आहे. वारीचा मुख्य दिवस दि. 05 व 06 जुलै 2025 असून, यात्रा कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन शहरातील महत्वाचे रस्त्यावर पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत, शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत, पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत, पार्कीग व्यवस्था, एकेरी मार्ग याबाबत पुढील आदेश निर्गमित आहेत.
सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 30 जून 2025 रोजी 00.01. ते 08 जुलै 2025 रोजी 24.00 वाजे पर्यत पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत, शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत, पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत, पाकींग व्यवस्था, एकेरी मार्ग अनुषंगाने पुढील आदेश देत आहे.
पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत :-
अहिल्यानगर, बार्शी, टेंभुर्णी, करकंब कडून येणारी सर्व प्रकारची वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्या चौक), शेटफळ चौक मार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्कीग करतील तसेच 65 एकर च्या मागे असलेल्या नगरपरिषदेच्या जागेत मध्ये पार्किंग करतील.
मोहोळ मार्गे सोलापूर कडून येणारी सर्व प्रकारची वाहने ही मोहोळ रोड विसावा येथे (भिमा बसस्थानक) पार्कीग करतील. तसेच 65 एकर येथे पार्कीग करतील. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबावी विसावा व 52 एकर मैदानात पार्कीग करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस मध्ये पाकींग करतील.
कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्ग वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस मध्ये पार्कीग करतील व यमाई तुकाई मंदिर मैदान व बिडारी बंगला येथे पाकींग करतील.
सोलापूरकडून तिऱ्हे मार्गे पंढरपूर कडे येणाऱ्या सर्व वाहनांना सुस्ते चौक येथून पंढरपूर कडे येण्यास मनाई आहे. सदर मार्गावरून येणारी वाहने सुस्ते चौक येथून तुंगत गावातून पुढे इच्छित मार्गाने जातील.
पंढरपूर शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत :-
अहिल्यानगर ,टेंभुर्णी, सोलापूर, लातूर, धाराशिव कडे जाणा-या सर्व गाडया सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, कौटाळी बायपास, नविन सोलापूर नाका, अहिल्या चौक या मार्गाने जातील,
पुणे, सातारा कडे जाणा-या सर्व गाडया सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, वाखरी मार्ग जातील. विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढाकडे जाणा-या सर्व गाडया सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगाव फाटा पासून संबंधीत आपल्या मार्गे जातील.
पंढरपूर शहतील अंतर्गत वाहतुकीबाबतः-
दि. 30 जून ते 08 जुलै 2025 पर्यंत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे. महाव्दार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. अहिल्यानगर, संभाजी नगर, बाशी, सोलापूर या मार्गावरून येणारी फक्त हलकी वाहने अहिल्यादेवी चौक, तीन रस्ता मार्ग नवीन पुलावरून अंबाबाई पंटागणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी येणा-या एस.टी बसेस यांना जुना दगडीपुल, नवीन पूल, तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे, मंगळवेढा नाका, लहुजी वस्ताद चौक महात्मा फुले चौक, या मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पंटागण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते शिवाजी चौक ते अर्बन बँक, भक्ती मार्ग ते काळामारूती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांस बंद करण्यात येत आहे.
पाकींगची व्यवस्थाः-
अहिल्यानगर, बाशी, सोलापूर, मोहोळकडून येणारी सर्व प्रकारची वाहने अहिल्या चौक, तीन रस्ता मार्गे मोहोळ रोड विसावा,भिमा बस स्टँड येथे पाकींग करतील तसेच 65 एकर मागे नगरपरिषदेच्या पार्किंग येथे पाकींग करतील. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा व 52 एकर मैदानात पार्कीग करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाउस मध्ये पाकींग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, ढाकळी बायपास मार्गे वेअर हाउस मध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस मध्ये पार्कीग करतील व यमाई-तुकाई मंदिर मैदान तसेच बिडारी बंगला येथे पार्कीग करतील. यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पंटागण, गजानन महाराज मठ पार्कीग, नगरपालिका पार्कीग, क्रिडा संकुल, सखुबाई पार्कीग येथे व तसेच संबंधीत मठामध्ये पार्क होतील. व इतर वाहने जुन्या कराड नाक्या समोरील मार्केट यार्ड येथे पार्क होतील. शहरामधील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पाकीग होणार नाही.
एकेरी मार्ग :-
कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
एस. टी बसेस :-
विदर्भ, मराठवाडा, सोलापूर विभागातील यात्रेकरीता येणा-या एस.टी बसेस या भिमा बस स्थानक (यात्रेकरीता करण्यात आलेले) या ठिकाणी भाविकांना सोडतील व त्याच ठिकाणी पार्क करतील,
अहिल्यानगर विभाग, नाशिक विभाग व जळगाव विभाग याबाजूकडून यात्रेकरीता येणा-या बसेस या विठ्ठल अलायटिंग पॉईंट (अहिल्या चौक जवळ) या ठिकाणी भाविकांना सोडतील व विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या ठिकाणी पार्क होतील, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व कोकण विभाग या बाजूकडून यात्रेकरीता येणा-या एस.टी बसेस या कासेगाव फाटा, टाकळी बायपास, गादेगाव फाटा, गादेगाव, सातारा नाला, बाजीराव विहीर, कौठाळी बायपास फाटा, जुन्या अकलुज रोडने चंद्रभागा बस स्थानक या ठिकाणी येतील, व वरील मार्गे भाविकांना घेवून परत जातील. सदर बसेस या चंद्रभागा बस स्थानक या ठिकाणीच पार्क होतील. कोल्हापूर, सांगली, मंगळवेढा व कोकण विभाग या बाजूकडून यात्रेकरीता येणा-या एसटी बसेस या कासेगाव फाटा, बिडारी बंगला येथुन जुना कासेगांव रोड आय. टी. आय कॉलेज येथे पार्क करतील व वरील मार्गे भाविकांना घेवुन परत जातील.
शहरातून जाणा-या जड वाहतुकीबाबतः-
पंढरपूर शहराकडे येणारी जड-अवजड वाहतुकीच्या वाहतुक नियमनाबाबत स्वतंत्र जाहिरनामा निर्गमित करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधिक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांनी आदेशित केले आहे.
जड वाहतुक नियमन जाहीरनामा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. 30 जून 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीत आषाढीवारी भरणार असुन सदर यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातून जाणा-या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणा-या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होवू नये याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रं 2300/2025 दि. 05 जून 2025 अन्वये व पंढरपूर शहराकडे येणारी जड- अवजड वाहतुक संबंधीत पोलीस ठाणे हददीतील योग्य त्या पॉईंटवरून बंद करून ती अन्य पर्यायी मार्गाने वळविणेबाबत निदर्शनास आणून दिले आहे. तसेच कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांनी त्यांचेकडील पत्र क्र. 1527/2025 दि. 09 जून 2025 अन्वये आषाढीवारी कालावधीमध्ये वेळापूर ते महुद ते सांगोला या मार्गावरून एकेरी जड वाहतूक 40 किमी वेगमर्यादेचे बंधन घालून चालू करणेबाबत आमचे निदर्शनास आणून दिले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये अधिकारान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल वि. कुलकर्णी यांच्या आदेशान्वये भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरून दिनांक 30 जून 2025 रोजी 00.01 ते दिनांक 08 जुलै 2025 रोजी 24.00 वा. पर्यंत पंढरपूर शहर बाहय मार्गावरून जाणारी जड वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने खालील नमूद ठिकाणावरून जङ-अवजड वाहतूक (शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गैस सिलेंडर, उस वाहतुक करणारी वाहने वगळुन) बंद करणेबाबत निर्देशित करीत आहोत.
पर्यायी मार्ग -
पोलीस ठाणे- मोहोळ- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे- शिवाजी चौक – पर्यायी मार्ग -मोहोळ -कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी-इंदापूर
पोलीस ठाणे-मोहोळ- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे- शेटफळ चौक- पर्यायी मार्ग- शेटफळ टेभुणी इंदापूर किंवा शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सां गोला.
पोलीस ठाणे-मोहोळ- पोलीस ठाणे - टाकळी सिकंदर - पर्यायी मार्ग- टाकळी सिकदर-कुरूल-मोहोळ-शेटफळ-टेभुणी किंवा टाकळी सिंकदर-कुरूल-कामती-मंगळवेढा-सां गोला
पोलीस ठाणे - जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे-पेनुर – पर्यायी मार्ग- पेनुर-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सां गोला किंवा पेनुर-मोहोळ-शेटफळ-टेभुर्णी.
पोलीस ठाणे –कामती –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण –कुरूल चौक- कुरूल-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा कुरूल-मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी.
पोलीस ठाणे- टेंभूर्णी - जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण –वेणेगाव फाटा- वेणेगाव-टेभुणों- इंदापूर किंवा वेणेगाव-शेटफळ-मोहोळ-कामती-मं गळवेढा- सांगोला.
पोलीस ठाणे- टेंभूर्णी- जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- अकलुज चौक-पर्यायी मार्ग- टेभुर्णी-शेटफळ-मोहोळ-कामती-मं गळवेढा-सांगोला किंवा टेभुर्णी-इंदापूर.
दिनांक 03 जुलै 2025 रोजी 20.00 पासूनअकलूज चौकातून सर्व प्रकारची वाहतुक चालू राहील
पोलीस ठाणे –वेळापूर –जड वाहतूक प्रवेश बंद ठिकाण –श्री ज्ञानेश्वर चौक पर्यायी मार्ग – वेळापूर ते साळमुख ते महुद-सांगोला-मंगळवेढा-कामती.
पोलीस ठाणे –वेळापूर –जड वाहतूक प्रवेश बंद ठिकाण –साळमुख चौक-पर्यायी मार्ग-साळमुख ते महुद-सांगोला –मंगळवेढा-कामती.
पोलीस ठाणे-सांगोला –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण-महुद चौक- पर्यायी मार्ग-महुद-सांगोला-मंगळवेढा-का मती-मोहोळ
पोलीस ठाणे-सांगोला –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- मंगळवेढा-कोल्हापूर बायपास पुलाखाली-पर्यायी मार्ग- सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ- शेटफळ-टेभुर्णी.
पोलीस ठाणे-मंगळवेढा –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- मंगळवेढा नाका बायपास-पर्यायी मार्ग- मंगळवेढा-कामती-मोहोळ शेटफळ टेंभुर्णी किंवा मंगळवेढा-सांगोला
पोलीस ठाणे-करकंब –जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- भोसे पाटी-पर्यायी मार्ग- करकंब वेणेगाव-टेंभुर्णी-इंदापूर मार्गे पुढे इच्छितस्थळी किंवा करकंब वेणेगाव-शेटफळ-मोहोळ-कामती-मं गळवेढा-सांगोला.
दि. 03 जुलै 2025 रोजी 20.00 पासून टेंभूर्णी येथील अकलुज चौकातून अकलूज, वेळापूर, महुद, सांगोला या मार्गाने जाणारी सर्व प्रकारची वाहतुक चालू राहील. दिनांक 09 जुलै 2025 रोजी 00:01 वाजेपासुन वेळापूर ते महुद ते सांगोला जाणारी जड वाहतुक क्र. जिवानिशा/सांगोला/महुद/जडवाहतुक बंद/2024/200 दि. 26 /02/2024 च्या आदेशा प्रमाणे बंद राहील.
सदरचा आदेश हा दि. 30 जुन 2025 रोजी 00.01 ते 08 जुलै 2025 रोजी 24.00 वाजे पर्यत अंमलात राहील आषाढीवारी कालावधी संपताच जा.क्रं/जिवाशा/पंढरपूर जड वाहतुक नियमन /2019/19 दिनांक 07/04/2019 तसेच क्र. जिवानिशा/सांगोला/महुद/जडवाहतुक बंद/2024/200 दि. 26/02/2024 चा आदेश पुर्ववत अंमलात राहील. असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल वि. कुलकणी (भा.पो.से.) यांनी दिला आहे.
संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतुनियमन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्या अर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रं 3246 /2025 दिनांक 19 जून 2025 अन्वये श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथुन श्री ची पालखी पायी पंढरपूर येथे प्रत्येक आषाढीवारीसाठी येत असते. सदर पालखी ही सोलापूर तालुका पोलीस ठाणे
हददीतील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून दिनांक 28जून 2025रोजी 03.00 वाजणेच्या सुमारास धाराशिव जिल्हयातून सोलापूर जिल्हयात प्रवेश करून उळेगाव येथे मुक्कामास असते, दिनांक 29 जून 2025 रोजी पहाटे 05.00 वा.चे दरम्यान पालखी उळेगाव येथुन प्रस्थान करून सोलापूर शहरात जाते व तेथे पालखी दोन दिवस मुक्कामी असते. दिनांक 01 जुलै 2025 रोजी पालखी सोलापूर येथुन प्रस्थान करून सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील ति-हे या गावी मुक्कामी असते. त्यांनतर दिनांक 02 जुलै 2025 रोजी पुढे प्रस्थान होवून पालखी माचणूर येथे मुक्कामी असते. तर दिनांक 03 जुलै 2025 रोजी पालखी माचणूर येथून प्रस्थान होवून पुढे मंगळवेढा येथे मुक्कामी असते. सदर पालखी सोहळयामध्ये पालखी सोबत पायी जाणारे वारकरी व वाहने असतात. तसेच श्रींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. अशातच या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने पालखी सोहळा हददीतुन पुढे घेवुन जाणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळे सदर पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.
तथापी संत गजानन महाराज पालखीचे लहान स्वरूप, पालखी सोहळयामधील सहभागी होणा-या भाविकांची शिस्त तसेच पालखी ज्या मार्गावरून जाते (सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-मंगळवेढा) हे मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने चौपदरी असल्याने सदरचे महामार्ग वाहतुकीकरीता पुर्ण बंद करणे उचित होणार नसल्याने आम्ही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से.), सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतूक नियमनाबाबत संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणेबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
पालखी सोहळा व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्री. संत गजानन महाराज पालखी व पायी चालत जाणारे वारकरी ज्या मार्गावरून जसजसे पुढे येत जातील, फक्त त्याच मार्गावरील वाहतुक (पालखी जात असलेल्या मार्गिकेमधून जाणारी वाहतुक) त्या भागापुरती टप्प्या टप्याने बंद करून त्या - त्या भागापुरती वाहतुक रस्त्यावरील दुसरे बाजूचे मार्गिकेमधून (लेनने) वळविण्यात यावी.
सदरच्या पालखी महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींग करून पुरेशा प्रमाणात बंदोबस्त नेमून सदर पालखी सोहळयात कोणत्याही प्रकारची वाहने आडवी येणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से.) यांनी दिला आहे .
0 Comments