केवळ सेवा देण्यामुळेच शिक्षकाला निवृती नंतर देखील समाधानी आयुष्य लाभते- माजी आ. दत्तात्रय सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

केवळ सेवा देण्यामुळेच शिक्षकाला निवृती नंतर देखील समाधानी आयुष्य लाभते- माजी आ. दत्तात्रय सावंत

 केवळ सेवा देण्यामुळेच शिक्षकाला निवृती नंतर देखील समाधानी आयुष्य लाभते- माजी आ. दत्तात्रय सावंत



वैराग (कटूसत्य वृत्त):- शिक्षण क्षेत्रात नवनविन अभ्यास पद्धती व प्रणाली येत आहेत ,त्या स्विकारून शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षक हा आयुष्यभर विद्या दानरूपी सेवा देण्याचे काम करतो त्यामुळे त्याच्या सेवा निवृत्ती नंतरच्या  आयुष्यात सुद्धा त्याला समाधानकारक लाभते. असे प्रतिपादन पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.
 वैराग (ता .बार्शी )येथिल विद्या मंदिर हायस्कूलमध्ये  टेक्निकल विभागात शिक्षक म्हणून कार्यरत अंगद रंगनाथ कांबळे यांच्या सेवापूर्ती निमित्त  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष भूषण भूमकर हे उपस्थित होते .
 
यावेळी संस्थेच्या वतीने अंगद कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. कांबळे यांनी आपल्या सेवापूर्ती व वाढदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी  संस्थेला वह्या भेट दिल्या . यावेळी अंगद कांबळे यांनी आपल्या मनोगतातून प्राथमिक शिक्षणा पासून ते सेवानिवृती पर्यतचा जडण - घडणीचा आलेख मांडला.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष - निरंजन भूमकर, चेअरमन - मृणाल भूमकर , सचिव - निनाद भूमकर, माजी उपसरपंच - संजय भूमकर,पिंपळनेरच्या ( ता .माढा ) सरपंच अनुजा डांगे ,माजी जिल्हा परिषद सदस्य - संजय डांगे, पत्रकार सुहास कांबळे ,नगरसेवक नागनाथ वाघ, वैजिनाथ आदमाने, पिंटु लांडगे, हरिश गाडेकर, मुख्याध्यापिका सुवर्णा वैदय, दादासाहेब कळसाईत , अशोक दाताळ ,संस्कारधाम फाउंडेशनचे संस्थापक सत्तार तांबोळी उपस्थित होते.
 सुत्रसंचालन कालिदास जानराव यांनी केले .प्रास्ताविक - मुख्याध्यापक कल्याण करंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages