शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करुनच अध्यापन करावे - केंद्रप्रमुख रमाकांत पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 28, 2025

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करुनच अध्यापन करावे - केंद्रप्रमुख रमाकांत पवार

 शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करुनच अध्यापन करावे - केंद्रप्रमुख रमाकांत पवार 


माढा (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील शाळेतील प्रत्येक इयत्तेतील सर्वच विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता,गुणवत्ता व क्षमता सारखी नसते त्यामुळे शिक्षकांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती आणि त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन प्रभावी,आनंददायी, सहजसोप्या व कृतीयुक्त पद्धतीने अध्यापन केल्यास गुणवत्ता वाढीसाठी व अध्ययन स्तर उंचावण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन केंद्रप्रमुख रमाकांत पवार यांनी केले.

ते मानेगाव ता.माढा येथे प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षण परिषदेत नूतन मुख्याध्यापक,पुरस्कार प्राप्त शिक्षक व उद्दिष्टापेक्षा अधिक पटनोंदणी केलेल्या शाळांच्या सत्काराच्या वेळी बोलत होते.

प्रास्ताविक सहशिक्षक प्रसन्न दिवाणजी यांनी केले. 

यावेळी नूतन मुख्याध्यापक रोहिदास कापसे,तंत्रस्नेही शिक्षक रमेश पाचफुले, सेवानिवृत्तीबद्दल आण्णासाहेब क्षीरसागर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अतुल देशमुख,आदर्श शिक्षक सुनील मोहिते व स्मिता नाझरे यांनी पहिलीच्या इयत्तेत शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या उदिष्टापेक्षा अधिक पटनोंदणी केल्याबद्दल केंद्रप्रमुख रमाकांत पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक रोहिदास कापसे,आण्णासाहेब पाटील, अतुल देशमुख,बाळासाहेब क्षीरसागर,सुनील मोहिते, शिवाजी भोगे,तनुजा तांबोळी, स्मिता नाझरे,उषा वाघमारे, मंजुषा मंडलिक,सतीश माळी, परशुराम कदम,भालचंद्र पारडे, जयहिंद खरात,अरबाज इनामदार,अतुल खाडे, आत्माराम क्षीरसागर,गंगाराम मोहिते,अभिमन्यू गायकवाड, नागनाथ कन्हेरे यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages