स्वामी विवेकानंद प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

स्वामी विवेकानंद प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा

 स्वामी विवेकानंद प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एन.ए.बी. संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे दि.16/06/2025 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र भंडारे (माजी स्थायी सभापती) हार्दिक निमाणी (नॅब समाविष्ट सदस्य) व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर  उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले .कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हवेत फुगे सोडून नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले व नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख अतिथी यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व करियर कसे घडवावे याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतामध्ये अभ्यासाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षा याविषयी आपले मत मांडले. याप्रसंगी सपताळे,कोळी, हिंगमिरे मॅडम, शिंदे, राठोड,निलंगीकर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष माने यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages