Hot Posts

6/recent/ticker-posts

दर्जेदार शिक्षणामुळेच गावाची ओळख निर्माण होते-मिनाक्षी वाकडे

 दर्जेदार शिक्षणामुळेच गावाची ओळख निर्माण होते-मिनाक्षी वाकडे



 माढा (कटूसत्य वृत्त):- उपळाई बु केंद्रातील सर्वच शाळामध्ये उत्तम आणि दर्जेदार शिक्षणामुळेच आज देशभरात गावाचे नाव घेतले जाते.या गावातील अधिकारी घडविण्यामध्ये जि.प.शाळांचा आणि मार्गदर्शन करणारे गुरुजनांचा मोठा वाटा आहे. दर्जेदार शिक्षणामुळेच गावाची ओळख निर्माण होते असे प्रतिपादन वित्त व लेखा अधिकारी मिनाक्षी वाकडे जि.प.शाळा उपळाई बु येथे शाळा  प्रवेशोत्सव प्रसंगी व्यक्त केले. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथमतः प्रभातफेरी काढुन मुलांचे औक्षण करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपूण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिली ते चौथीच्या वर्गातील किमान 75 टक्के विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे गरजेचे आहे. असे गटशिक्षणाधिकारी विकास यांनी म्हटले आहे.
शाळेतील सुविधांचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या स्वच्छ समाज, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होण्याबरोबरच बालकांचा आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होण्याची तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी मा.पंचायत समिती सदस्य दीपक देशमुख शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सिद्धेश्वर आखाडे व मान्यवर उपस्थित होते. आभार शर्मिला वाघ यांनी मानले कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन दिनेश गुंड यांनी केले
 जि.प.शाळा मसोबावाडी येथेही शाळा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा
उपळाई बु केंद्रातील जि,प.शाळा मसोबावाडी येथे ही प्रभातफेरी काढून मुलांचे औक्षण करुन मुलांचे स्वागत करण्यात आले,शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तक ,गणवेश ,बुट ,सॉक्स शाळा व्यवस्थापन सामितीचे अध्यक्ष रमेश मुळे यांच्या शुभहस्ते वितारीत करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष प्रमोद खराडे संतोष शेंडे अनिल माळी ,रामा कांबळे,सौ.सारिका कांबळे संजय ढवळे सुर्याकांत उबाळे रणजित जाधव उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments