अॅडव्हेंचर पार्क महिनाभरात सुरू करणार !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका उपसमितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अँडव्हेंचर पार्क आणि हुतात्मा गार्डनसाठी मक्तेदार निश्चित करण्यात आले. महिनाभरात अॅडव्हेंचर पार्क सुरू होईल,
अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात अॅडव्हेंचर पार्क विकसित करण्यात आले होते. नव्याची नवलाई झाल्यानंतर हे पार्क बंद झाले. बागेतील साहित्य खराब झाले. त्याच्या दुरुस्तीवर महापालिकेचा मोठा खर्च झाला.
स्मार्ट सिटीतून झालेल्या कामांची योग्य विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
त्यांनी पहिल्या टप्प्यात मक्तेदार महापालिकेला देणार आहे. येत्या महिनाभरात अॅडव्हेंचर अॅडव्हेंचर पार्क, सिध्देश्वर तलाव परिसरांतील वॉकिंग ट्रॅक, बाबागाडी याचे मक्तेदार निश्चित केले.
या ठिकाणची देखभाल दुरुस्ती आणि सोयी सुविधांचा खर्च मक्तेदाराकडून करण्यात येणार आहे. शिवाय दरमहा ७५ हजार रुपये संबंधित पार्क सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने हा संपूर्ण प्रकल्प लोकांसाठी उपलब्ध होईल, असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले.
हुतात्मा गार्डनचाही मक्तेदार निश्चित करण्यात आला असून या संपूर्ण परिसराच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही संबंधित मक्तेदार करणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त खेळण्याचे साहित्य आणि इतर सोयी
सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
साधारण साहित्य वापराकरिता कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र, इतर व्यावसायिक खेळणी व साहित्याला शुल्क घेण्यात येईल. हुतात्मा गार्डन आणि अॅडव्हेंचर पार्कसाठी तीन वर्षाचा मक्ता देण्यात येत आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
चौकट
उपायुक्त लोकरे नोडल अधिकारी नियुक्त
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत झालेल्या विविध विकासकामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त आशिष लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातली आवश्यक ती सर्व जबाबदारी उपायुक्त लोकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
0 Comments