ग्रंथपालन वर्ग परीक्षा सुरु
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2025, केंद्र - सोलापूरचे दरवर्षीप्रमाणे परीक्षा सुरु झाले असून चालू वर्षी महाराष्ट्र शासनाकडून अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. दरवर्षी या वर्गास शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत होते पण चालू वर्षापासून याची पात्रता 12वी पास केली आहे. तसेच वर्गाचा कालावधी तीन महीन्या ऐवजी सहा महीने म्हणजेच जानेवारी ते जून असा केला आहे. पदवी परीक्षेप्रमाणे विषयाचे विभाजन केले असून वर्गीकरण प्रात्यक्षिक व तालिकीकरण प्रात्यक्षिक, या विषयांना समाविष्ठ करुन एक विषय बनविला आहे. त्याच प्रमाणे वर्गीकरण तात्विक व तालिकीकरण तात्विक या विषयांचे एक विषय बनविला आहे. अभ्यासक्रमामध्ये कात्रण प्रकल्प, ग्रंथसूची, ग्रंथपरीक्षण प्रत्यक्ष वाचनालयात 75 तास काम करणे यासारखे विषय वाढविले आहेत. ग्रंथालय आणि समाज हा एक विषय नविन स्वरुपात समाविष्ठ केला आहे. ग्रंथालयातील संगणक वापरासाठी ग्रंथालय तंत्रज्ञान या विषयाला सुध्दा समाविष्ठ करण्यात आले आहे .
सद्या सोलापूर केंद्रात 50 विद्यार्थ्यांनी व माजी 29 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांची लेखी परीक्षा सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या नविन इमारतीमध्ये म्हणजे यशदा अभ्यासिका 117/245 उमा सहकारी गृह निर्माण संस्था जूना पूणा नाका, लोकमंगल ऑक्सिपार्कच्या समोर, सोलापूर येथे परीक्षाधिकारी श्रीकांत संगेपांग, पुणे त्यांचे सहकारी प्रदीप गाडे यांच्या नियंत्रणात सुरु आहेत. सदर ग्रंथपालन वर्गास वर्गव्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे , वर्ग मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, वर्ग शिक्षक गणेश फंड, दत्तात्रय मोरे, सौ वृषाली हजारे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर वर्ग यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार, कार्यवाह साहेबराव शिंदे संघाचे सर्व पदाधिकारी सर्व संचालक हुतात्मा सार्व. वाचनालयाचे पदाधिकारी सेवक गीतांजली गंभीरे वर्गाचे लिपीक सारीका माडीकर या सर्वांचे सहकार्य लाभले.
0 Comments