Hot Posts

6/recent/ticker-posts

विदेशी अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई

 विदेशी अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपआयुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीमती भाग्यश्री जाधव, राज्य उत्पादन शुल्क एस.आर.पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.1 या कार्यालयाने दिनांक 10 जून 2025 रोजी मोहोळ तालुक्यातील मोजे सिकंदर टाकळी व कुरूल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या विदेशी मद्याचे वाहन क्र. एम.एच 07 ए.एस-3534 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे 60 बॉक्सेस व एम.एच 07 ए जी 8898 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे एकुण 80 बॉक्सेस व दोन चारचाकी वाहनास एकुण सदर कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरिक्षक आर.एम.चवरे व दुय्यम निरीक्षक एस.डी.कांबळे हे करीत आहेत.
            तसेच दिनांक 1 एप्रिल 2025 व 10 जून 2025  या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण 570 गुन्हे नोंद करण्यात आले असून 571 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत 2 लाख 14 हजार 925 ली. रसायन, 9 हजार 775 लि. हातभट्टी दारू, 1053.19 ब लि.देशी मद्य, 584.32 ब.ली. विदेशी मद्य, 102.32 ब.ली.बिअर, 3278 ली.ताडी तसेच 53 वाहनास एकुण रुपये 1 कोटी 68 लाख 99 हजार 550 रुपयाचा प्रोव्हि.गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गतवर्षीच्या सन 2023-24 च्या तुलनेत सन 2024-25 या वर्षात एकुण गुन्ह्यात 25 टक्के व एकुण मुद्देमालात 35 टक्के वाढ झाली आहे.
            तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या सोलापूर शहर व जिल्हा परिसरातील हॉटेल लक्ष्मी सावजी, हॉटेल न्यु हरीयाणा धाबा, डि,के. कोल्ड्रिंक्स हाऊस, हॉटेल भवानी, हॉटेल अविराज चायनिज, हॉटेल टोणपे, बालाजी मटण भाजनालय, शेख कोल्ड्रिंक्स हाऊस, असे एकुण 33 ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असून ढाब्यावर कलम 68 व 84 अन्वये 132 जनांवर कारवाई करण्यात आली असून मा. न्यायालयाने ढाबा मालक यांना रुपये 25 हजार व मद्यपी ग्राहक यांना सरासरी रुपये 500 रूपये ते 3 हजार रुपेय असे मिळुन एकुण रुपये 5 लाख 51 हजार इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
            सदर कारवाई निरीक्षक आर.एम.चवरे, तसेच दुय्यम निरीक्षक एस.डी.कांबळे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, व जवान सर्व नंदकुमार वेळापूरे, अण्णा कर्चे, पवन उगले, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, महिला जवान शिवानी मुढे वाहनचालक दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
            अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे राज्य पत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments