जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची खा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची खा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची खा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 



 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- केंद शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनापासून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.

          नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्या सह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

       यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमबजावणी होण्यासाठी विविध सूचना मांडल्या तसेच समस्याही मांडून त्या प्रशासनाने त्वरित सोडवण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी मागणी केली.

       प्रारंभी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती व सद्यस्थिती बैठकीत सादर केली. दिशा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांकडून केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

 

केंद्रीय योजना आढावा -

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,

दिन दयाळ अंत्योदय योजना / राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना शहरी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहय कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBM-G), राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRWDP), केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान सोलापूर पाणीपुरवठा शहर, केंद्र शासन पुरस्कृत सोलापूर शहर भूयारी गटार योजना, अमृत ड्रेनेज, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY), एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP), भूमी अभिलेखाचे संगणकीकरण (NRLMP), सोलापूर स्मार्ट सिटी, P.M. स्व निधी, दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना (DDU-GJY), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, प्रधानमंत्री कृषी विमा योजना, राष्टीय आरोग्य अभियान ग्रामीण, राष्ट्रीय आरोग्य अभियान शहरी, सर्व शिक्षा अभियान ग्रामीण, सर्व शिक्षा अभियान शिक्षण मंडळ शहर, समग्र शिक्षा / माध्यान्ह भोजन योजन शिक्षण मंडळ शहर, एकात्मिक बाल विकास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री उज्वला योजना, Digital India Public Internet Access Programme- Providing Service Centre on each Grampanchayat, पायाभूत विकास कार्यक्रम महामार्ग, टेलीकॉम, रेल्वे इ., सांसद आदर्श ग्राम योजना आणि रे नगर फेडरेशन तर्फे सोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी, या प्रकारे खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील दिशा समितीने केंद्रीय योजनांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याप्रमाणेच पुढील दिशा समितीच्या बैठकीस सर्व 58 शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सूचित केले.

      जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी दिशा समितीच्या आजच्या बैठकीच्या विषयाची माहिती दिली तसेच बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

***


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages