माढा, करमाळा व बार्शी तालुक्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात- जिल्हाधिकारी आशीर्वाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

माढा, करमाळा व बार्शी तालुक्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात- जिल्हाधिकारी आशीर्वाद

 माढा, करमाळा व बार्शी तालुक्यातील पालखी मार्गावर वारकऱ्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात- जिल्हाधिकारी आशीर्वाद 





सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी असून सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दहा मानाच्या पालख्या तसेच अन्य पालख्या  यांच्या समवेत लाखो वारकरी, भाविक राज्याच्या विविध भागातून पंढरपूर येथे येत असतात. माढा, करमाळा व बार्शी या तालुक्यातून ही महत्त्वाच्या पालख्या, दिंड्या  पंढरपूर कडे जातात. तरी या तालुक्यातील पालखी मार्गावर पालखी सोहळ्यास व वारकऱ्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही या पद्धतीने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
      श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याप्रमाणे माढा करमाळा व बार्शी तालुक्यातील येणाऱ्या पालख्यांसाठी पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा ठिकाण यासह अन्य सोयी सुविधा बाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप विभागीय अधिकारी अमित माळी, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माढा करमाळा व बार्शी तालुक्यातील जाणाऱ्या महत्त्वाच्या पाच पालख्या, दिंड्या व हजारो वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. पालखी मार्ग व्यवस्थित असावे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. स्नानगृहे व शौचालयाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी. पालखी मुक्काम ठिकाणी जलावरोधक मंडप टाकावे. पाऊस आल्यानंतर वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची भैसे होणार नाही या दृष्टीने तळावर सुविधा उपलब्ध कराव्यात. स्नानगृहे व शौचालय जाण्यासाठी चांगले रस्ते असावेत. पिण्याच्या पाण्याचे तसेच वापराच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध आहे का याची खात्री करावी असे निर्देश त्यांनी दिले. 
    बार्शी तालुक्यातून जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा मार्ग व्यवस्थित असला पाहिजे याची खात्री उपविभागीय अधिकारी यांनी करावी. शेंदरी जवळील पालखी मार्गाच्या पूलावर संरक्षक कठडे टाकावे, तसेच बॅरिकेट लावून येथून जाताना वारकऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages