Hot Posts

6/recent/ticker-posts

मातोश्री वच्छला गायकवाड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

 मातोश्री वच्छला गायकवाड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ गायकवाड यांच्या मातोश्री वत्सलाबाई श्रीधर गायकवाड यांचा 61 वा वाढदिवस छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तसेच शिव मावळा संघटन यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर येथे मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. 
यामध्ये प्रार्थना फाउंडेशन च्या अनाथ व निराधार ५०  शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या 
त्याच बरोबर श्रद्धा प्रवीण माने, विराज संभाजी साळुंखे, पोपट वाळसंगे, महबूब शेख, स्वराज सचिन साळुंखे, केतन किशोर धुळे, देवराज श्रीशैल विभुते 
 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
त्याचबरोबर शिवश्री लहू गायकवाड यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ बाळासाहेब ठाकरे अध्यापन केंद्र संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सर व वधू वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष अंबादास सपकाळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी मराठा सेवा संघ 33 कक्ष शिव मावळा संघटन  त्याचबरोबर विश्वनाथ गायकवाड यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. 
प्रार्थना फाउंडेशन चे प्रसाद मोहिते यांनी विश्वनाथ गायकवाड यांच्या मातोश्रीं ना शुभेच्छा देत. सामाजिक बांधिलकी हरवत चाली असताना अनाथ मुलांना जो मदतीचा हात दिला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमासाठी सदाशिव पवार ,लक्ष्मण महाडिक ,उज्वला ताई साळुंखे,अभीजलीताई जाधव ,लता ताई ढेरे,जीवन यादव ,लिंबराज जाधव ,सोमनाथ राऊत ,ब्रह्मदेव पवार 'शिवाजी निळ ,कल्याण गव्हाणे ,लहू गायकवाड  राम माने ,सचिन चव्हाण ,नितीन मोहिते ,सुनील साळुंखे .गोवर्धन गुंड ,अंबादास सपकाळ ,रमेश अण्णा जाधव ,दत्ता पैलवान जाधव ,प्रकाश डोंगरे ,राजू व्यवहारे ,राजेंद्र भोसले ,श्रीनिवास सावंत ,विवेकानंद सावंत ,बिराजदार ',राहुल जाधव ,अथर्व यादव यांची उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, लिंबराज जाधव सर, सचिन चव्हाण, सदाशिव पवार, कल्याण गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments