पालखी मार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामांसाठी 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी- राम सातपुते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 19, 2025

पालखी मार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामांसाठी 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी- राम सातपुते

 पालखी मार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामांसाठी 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी- राम सातपुते  



माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील पालखी महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या कामांसाठी “ब गट” योजने मधून सुमारे 1 कोटी 5 लाख रुपयाचा निधी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केल्याने वारीला येणा-या ग्रामीण नागरिकांचा मार्ग सुकर व सुरक्षित होणार असल्याची माहिती राम सातपुते यांनी दिली. मांडवे येथील नातेपुते जुना पालखी रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

   यामध्ये माळशिरस तालुक्यात “ब गट” योजने मधून पवारवाडी गुरसाळे मुजवाडी रस्ता विशेष दुरुस्ती करणे 30 लाख रुपये,तोंडले दसुर रस्ता दुरुस्ती 10 लाख रुपये,मांडवे ते नातेपुते जुना पालखी रस्ता दुरुस्ती 30 लाख रुपये,निमगाव बनकरमळा रस्ता दुरुस्ती 25 लाख रुपये निधी,सदाशिवनगर ते मांडवे रस्ता 10 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
 या रस्त्यांच्या कामांसाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केलेल्या निधीद्वारे हे काम करण्यात येत आहे. असेही यावेळी राम सातपुते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages