अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 28, 2025

अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती

 अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती

            सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक-टंकलेखकाचे अशासकीय एक  पद मेस्को मार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 03  जून 2025 पुर्वी  जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद तुंगार यांनी केले आहे.
             जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्या माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दिनांक 03 जून 2025  रोजी मुलाखती घेण्यात येईल.
            सदर पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण केलेले किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील.  जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मिलींद तुंगार यांनी केले आहे.
                                                                       0000
 
अशासकीय शिपाई पदासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती
            सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शिपाई अशासकीय एक  पद मेस्को मार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 02  जून 2025 पुर्वी  जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद तुंगार यांनी केले आहे.
             जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची दिनांक 03 जून 2025  रोजी मुलाखती घेण्यात येईल.
            सदर पदाकरीता ऑफीसमधील कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तरी सदर संधीचा सोलापूर जिल्यातील माजी सैनिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
                                                                     00000

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages