Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हि.आर.पवार मध्ये साडी खरेदी करून महिला ग्राहक मनापासून समाधान व्यक्त करतात - राजेश पवार

 व्हि.आर.पवार मध्ये साडी खरेदी करून महिला ग्राहक मनापासून समाधान व्यक्त करतात - राजेश पवार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अंतःकरणापासून सांगायचं झालं तर व्हि. आर पवार यांच्या साड्या अगदी मनाला भावतात. आणि मग एक साडी घ्यायला आलेली महिला ग्राहक दोन कधी घेते हे समजतच नाही. आणि येथे खरेदी करून आम्ही समाधानी असतो असे येथे खरेदी करिता आलेल्या महिला ग्राहकांनी आवर्जून बोलून दाखवून दिले. हेच आमच्या यशाचे गमक आहे. असे प्रमुख व्यवस्थापक राजेश पवार यांनी सांगितले.

चाटी गल्ली येथील भव्य अशा दालनात लग्नबस्ता खरेदीसाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येताना दिसतात. याचे कारण महिला ग्राहकांना विचारले असता ते म्हणाले की आम्ही येथे वर्षानुवर्ष साडी खरेदी करण्याकरिता येतो आणि आता आमच्या भाचीचे लग्न आहे त्यामुळे शालू सह इतर साड्या खरेदी करण्यासाठी आलोत. 

कारण इथे साड्या व त्यांची रेंज आणि त्याचे डिझाईन आणि साड्यांची दर्जा पाहता महिलावर्ग सुखावून जातात. साड्यांचा दर्जा आणि त्याचे डिझाइन्स. आम्हीही खूप भावुक होऊन जातो. आणि येथील सेवक वर्ग कंटाळा न करता कितीतरी वेळा साड्या पाहण्यास सांगतात आणि त्याचे महत्त्व पटवून देतात. म्हणून येथेच लग्नबस्ता खरेदीसाठी आलो असे सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथील महिला ग्राहकांनी आवर्जून सांगितले.

लग्नबस्ता व आहेराच्या साड्या खरेदी करण्यासाठी व्ही. आर. पवार मध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. सोलापूरसह, लातूर, धाराशिव, बीड तसेच पुणे, मुंबई येथील ग्राहकही मोठ्या प्रमाणात खरेदीला येताना दिसत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

व्ही.आर. पवार सारीज मध्ये डिझायनर शालू, डिझायनर ब्रायडल लाच्या, सिंथेटिक, कॉटन, लिनन साड्या, डिझायनर ब्रायडल कंची आणि पैठणी सह ड्रेस मटेरियल, तसेच आहेर करण्याकरिता शूटिंग सुटिंग - शर्टिंग ची खरेदी देखील मोठ्या प्रमाणे होत आहे.

आपले मनपसंद साडी, शालू मिळवण्यासाठी आणि आहेराच्या साड्या खरेदी करण्यासाठी सोलापूर शहर व महाराष्ट्रातील ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावे असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments