पंतप्रधान मोदी, 'डरपोक',माणूस',काँग्रेसच्या माजी आमदाराने केली टीका
नंदुरबार (वृत्त सेवा ):- पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं यानंतर भारतावर ड्रोन हल्ले केले. भारतीय लष्करानं पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले हवेतच निष्प्रभ केले. भारतीय लष्कराच्या या अभिमानस्पद कामगिरीचं संपूर्ण देशात कौतुक होत आहे. सत्ताधारी भाजपबरोबर विरोधक काँग्रेस देखील भारतीय लष्कराच्या कौतुकात देशभर रॅली काढत आहेत. भाजप अन् काँग्रेस भारतीय लष्कराचं कौतुक करत असताना, एकमेकांच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. नंदुरबारचे काँग्रेस माजी आमदार के. सी. पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. माजी आमदार के. सी. पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, 'डरपोक', 'खुनी माणूस', 'गद्दार', असे शब्द वापरले. पाडवी यांचे हे शब्द आता काँग्रेसला अडचणीचे ठरू शकतात. भाजपच्या नेतृत्वावर वैयक्तिक टीका केल्यावर आतापर्यंत काँग्रेसचा अडचणी ठरली आहे. पाडवी यांनी केलेली ही जहरी टीका देखील काँग्रेसला अडचणी ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. के.सी. पाडवी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना, डरपोक आणि देशाला विकणारा पंतप्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा खुनी माणूस आहे, लोकांच्या जीव जातो आणि पंतप्रधानांना मजा येते. पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला संशयास्पद असल्याचं वाटतं, असे म्हटले.
काँग्रेसचे पाडवी यांनी या दहशतवादी हल्ला ज्यावेळेस पर्यटकांवर झाला, त्यावेळेस तिथली सुरक्षा व्यवस्था कुठे होती, असा सवाल केला. या दहशतीवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती झाली. हे युद्ध थांबवण्यासाठी दुसयांच्या मध्यस्थीची गरज का? घ्यावा लागली, असा सवाल देखील केला.
युद्धामुळे अदानी, अंबानीच्या अनुयांच्या नुकसान झालं. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली. सर्व आतंकवादी पळून गेल्यानंतर पाकिस्तानात हल्ला केला. युद्धाचा प्रचारासाठी सरकार वापरत असल्याचा आरोप के. सी. पाडवी यांनी केला.
0 Comments