सोलापूर शहरात पावसाने दाणादाण;
घरांचे तळे, रस्ते जलमय, अनेक नगरांमध्ये शिरले पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापुरात रोज हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सोलापूर शहर व परिसरात ८.४ मिलिमीटर पाऊस झाला. शहरातील भवानी पेठ, कुंभार वेस, घोंगडे वस्ती, हांडे वस्ती यासह वसंतविहार, बाळ्यातील गणेशनगर येथील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना घरातील पाणी काढण्याची वेळ आली. आज दुपारी ४ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची रिपरिप सुरू होती. तासाभरात झालेल्या पावसामुळे सोलापुरातील कोनापुरे चाळ, वीरगणपती परिसरात, कुंभारवेस नाला परिसर, सिव्हिल चौक, हरिभाई चौक व रामलाल चौक, पत्रकारभवन चौक रस्त्यावर पाणी, बाळे गणेशनगरात घरांमध्ये, कमलानगर ड्रेनेजच पाणी घरात, दत्तनगर बालाजी मंदिर, वसंतविहार या भागात पावसाचे पाणी शिरले होते. सोलापुरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे पाणी साठण्याच्या समस्या समोर येऊ लागल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातत्याने पाणी साठत आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, संवाद यंत्रणा अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे. आज दुपारपर्यंत प्रचंड उकाडा होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. साधारणतः चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाने हजेरी लावली त्यावेळी वारे नव्हते त्यामुळे साधारणतः अर्धातास अवकाळी पाऊस कोसळत होता. या पावसामुळे वातावरणातील उकाडा नाहीसा झाला होता.
0 Comments