Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील १५ लाख लोकांना जाणार मोबाईलद्वारे संदेश

 जिल्ह्यातील १५ लाख लोकांना जाणार मोबाईलद्वारे संदेश



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- पूरपरिस्थितीसह अन्य आपत्ती परिस्थिती उद्भवल्यास एकाचवेळी जिल्ह्यातील १,०३९ गावे आणि नगर परिषदांतील १५ लाख लोकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत मोबाईलद्वारे पूर्व सूचना संदेश पोहोचतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.


प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भीमा आणि सीना नदीकाठी असलेल्या सुमारे १०५ गावे संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये येतात. २०१९, २०२० या दोन्ही वर्षी भीमा आणि सीना नदीला महापूर आल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर नदीकाठच्या हजारो नागरिकांना स्थलातंरित करावे लागले येत्या २० दिवसांनंतर मान्सूनला होते.


त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मान्सून पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक घेतली. मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात किंवा मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच जिल्ह्यातील मध्यम व मोठे पाणी प्रकल्प भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती येऊ शकते. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.


चौकट 

मे महिन्यात घ्या बैठका

जिल्हा नियंत्रण कक्षाशी गाव व तालुकास्तरीय यंत्रणांनी संपर्क ठेवावा. त्याप्रमाणेच ग्राम व तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठका मे महिन्यात घेऊन संभाव्या पूरबाधित गावांत उपाय योजण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.


चौकट 

प्रकल्पांची करा दुरुस्ती

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी रचनात्मक उपाययोजना म्हणून मोठे व मध्यम तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती, नैसर्गिक पाणीसाठे, प्रकल्पाचे कालवे व सांडव्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments