टेंभुर्णी-अकलूज रोड, सोलापूर-पुणे रोड दीड वर्षापासून अंधारात
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी हे शहर सोलापूर पुणे या मध्यवर्ती ठिकाणी आहे टेंभुर्णी ला मराठवाड्याची प्रवेशद्वार म्हटले जाते. या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे टेंभुर्णी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शासनास महसुल मिळतो. त्यामुळे केंद्र शासनाने गावातील रोड नूतनीकरण करून गावातील वाहतुकीची समस्या सोडवली आहे. परंतु सदर ठेकेदाराने काम करताना निकृष्ट दर्जाचे केलेले आहे त्यामुळे टेंभुर्णी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांनी निवेदन देऊन. महामार्गाला जोडणारे रस्ते करमाळा रोड, कुर्डूवाडी रोड, बेंबळे रोड, यांचा कोणताही ताळमेळ ठेवलेला नाही. त्यामुळे टेंभुर्णी शहरात ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. कारण गावांमध्ये वाहतूक होत असताना कोणतेही गतिरोधक टाकलेले नाही. त्यामुळे मोठी वाहने वेगाने जातात व अपघात होतात.
ठेकेदाराने याचबरोबर गावातील जे पथदिवे आहे ते दीड वर्षापासून बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना वावरताना भटकी कुत्रे, जनावरे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावांमधून अशाच प्रकारचे अकलूज रोडचे ही पथदिवे बंद आहेत. अकलूज रोडचे नूतनीकरण होऊन दोन वर्ष होऊन सुद्धा त्या रोडवरील पथदिवे चालू केले गेले नाही . त्यामुळे सदरच्या वाडी वस्तीवर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना हा त्रास होत आहे. शहरामध्ये गतिरोधक चे गरजेचे होते त्यामध्ये कुर्डूवाडी चौक, बेंबळे चौक, बारावी मळा,भाजी मंडई, तसे बस स्थानका मध्ये दररोज 200 च्याआसपास गाड्या ये जा करतात त्या ठिकाणी वाहतूक होताना. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर पुणे महामार्गाला जोडणारा रस्ता खालीवर झाल्याने या ठिकाणी सतत अपघात होत आहेत यामुळे या ठिकाणी एक समान रस्ता करणे गरजेचे आहे. शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शहर रस्त्याच्या दोन्ही बाजूस विभागलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करताना जीव हातात धरून ओलांडावा लागत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे अतिक्रमणे आठवणीच्या दिशेने शासनाने पावले उचलावे. त्यामुळे टेंभुर्णी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एक महिन्याच्या आत मध्ये लाईट चालू करून नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा टेंभुर्णी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर उपोषण करण्यात येईल. काँग्रेस तर्फे निवेदन देताना प्रथमेश यादव, अनंत घळके, अतुल मांढरे, किरण घळके, उपस्थित होते.
0 Comments