नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 23, 2025

नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन

 नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन

 


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- दरवर्षी 21 जून हा “आंतरराष्ट्रीय योग” दिन म्‍हणून साजरा केला जातो“एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग” ही यावर्षीची संकल्पना आहे. लहान मुले-मुली, युवा-युवती, खेळाडू आणि वरिष्ठ नागरिक यांच्यामध्ये योग दिन आणि योग अभ्यासाचा सराव व्हावा या उद्देशाने केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने शासकीय मैदान, नेहरू नगर येथे दिनांक 23 व 24 मे 2025 रोजी सकाळी 6 ते 8 यावेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली आहे.  
               सदर योग शिबिराला आमदार सुभाष देशमुख, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, नीर सोशल फौंडेशनचे  अध्यक्ष हेमंत जाधव, न्यू जॉगर्स फौंडेशनचे अध्यक्ष संतोष आरवत्तु, उपाध्यक्ष वीरेश नसले आणि केंद्रीय संचार ब्यूरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदि मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
               भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या ४५ मिनिटाचे कॉमन योग प्रोटोकॉल अनुसार प्रार्थना, शिथिलीकरणदंड स्थितीतील ताडासन, वृक्षासनपादहस्तासनअर्ध चक्रासनत्रिकोणासन, बैठक स्थितीतील दंडासन, भद्रासन/बध्दकोनासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन उष्ट्रासन, शशांकासनउत्तान मंडूकासनवक्रासन, पोटावर झोपून करावयाची आसने मकरासन, भुजंगासन, शलभासन, पाठीवर झोपून करावयाची आसने सेतुबंध सर्वांगासन, उत्तानपादासन, अर्धहलासनपवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान, संकल्प आणि शांति पाठ आदी आसनांचा सराव योग सेवा मंडळाचे संस्थापक तथा योगगुरू मनमोहन भुतडा, विवेकानंद केंद्राचे नगर प्रमुख रवी कंटली आणि त्यांचे सहकारी घेणार आहेत. तसेच शिबिरात घेण्यात येणाऱ्या सर्व आसनांची माहिती नागरिकांना क्यू आर कोडच्या माध्यमातून मोबाईल मध्ये बघता यावी अशी व्यवस्था शिबिराच्या ठिकाणी करण्यात आली आहे.
              सदर योग शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.  
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages