जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करता येते - खा. उदयनराजे
सोलापूर / (कटुसत्य वृत्त):- सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या सुहास आदमाने यांनी अपार कष्टाच्या माध्यमातून शिरापूर सारख्या छोट्याशा खेडेगावांमध्ये 'स्पेन्का'ची निर्मिती केली. अवघ्या दहा वर्षांमध्ये चार राज्यात आपल्या कार्याचे जाळे विणले आहे. माणसाकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर यश प्राप्त करता येते, हेच त्यांनी दाखवून दिले, असे प्रतिपादन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
सात रस्ता येथील स्पेन्का कंपनीच्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. तद्नंतर हॉटेल बालाजी सरोवर येथे नव्या तंत्रज्ञानाच्या अल्कलाइन आयोनायझरचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, कष्ट केलं तर चांगले दिवस येतात हे सुहास आदमाने आणि त्यांच्या टीमने कृतीतून दाखवून दिले आहे. मी आज या कार्यक्रमाला स्वादचा एक हितचिंतक आणि त्याच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून आलो आहे.
अध्यक्षस्थानी प्रिसिजन कॅम्पशाफ्टसचे चेअरमन यतीन शहा हे होते. यावेळी 'स्पेन्का'चे व्यवस्थापकीय संचालक सुहास आदमाने, संचालिका अश्विनी आदमाने, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, माजी आमदार राजन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, 'स्पेन्का'चे विलास आदमाने यांच्यासह भूषण चिंचोळे, गणेश वानकर, प्रकाश चवरे, दीपक माळी, बसवराज शास्त्री, अनिल कादे, रामदास चवरे, दत्तात्रय मुळे, विनोद भोसले, अशोक देवकते, संकेत ढवळे, सौदागर चव्हाण, शशिकांत धोत्रे आदींची उपस्थिती होती.
उद्योजक दीपक जाधव यांनी प्रास्ताविक केले. तनिषा कदम यांनी स्पेन्का मिनरल वॉटर फिल्टरविषयी 'पीपीटी' द्वारे सादरीकरण करताना म्हणाल्या, गुणवत्ता, आपुलकीची सेवा आणि उत्तम व्यवस्थापनच्या माध्यमातून 'स्पेन्का'ने भारतातील एक नामांकित बँड म्हणून नावलौकिक प्राप्त केला. महाराष्ट्रसह कर्नाटक, तेलंगणा येथील ५ हजारांहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंटस व लाखो ग्राहकांपर्यंत 'स्पेन्का' ब्रँड पोहोचला आहे.
चौकट १
'स्पेन्का'च्या कॉर्पोरेट कार्यालय, अल्कलाईन मशीनचे उद्घाटन
चौकट २
खा.उदयनराजे भोसले यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो
'स्पेन्का'चे व्यवस्थापकीय संचालक सुहास आदमाने याप्रसंगी बोलताना म्हणाले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्याकडून मी अनेकानेक गोष्टी शिकलो-शिकत आहे. त्यांची विचार करण्याची पध्दत, निर्णय घेण्याची क्षमता ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे खूप आहे. फक्त त्यांची साथ सदैव पाठिशी राहावी, इतकीच माफ अपेक्षा आहे. त्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही.
0 Comments