Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 27 हजार 320 प्रकरणे सामंजस्याने निकाली

 राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 27 हजार 320 प्रकरणे सामंजस्याने निकाली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  मा.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये सन 2025 मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत दि.10 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 27 हजार 320 इतकी प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामधील तडजोडी मुल्य 1,49,18,63,016 (एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ट  हजार सोळा )  इतके राहीले. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकुण 31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुर्नस्थापित झाले.
सन 2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले आणि मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीतध्ये संपन्न झाले.याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश आर.जे.कटारिया, जिल्हा न्यायाधीश वाय.ए.राणे, जिल्हा न्यायाधीश जे.जे.मोहिते,तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस.व्ही.केंद्रे, जिल्हा सहकारी वकिल प्रदिपसिंग रजपूत, सोलापूर वकिल संघाचे अध्यक्ष व्ही.पी.शिंदे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधिर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे, तसेच इत्तर न्यायधीश विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सोलापूर महानिगरपालिकेतील सहाय्यक मुख्य निरिक्षक करसंचलन अधिकारी युवराज गाडेकर, कर निरक्षक दिलीप देशमुख, कार्यालयीन अधिक्षक सुर्यकांत खसगे व बैंक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री बैंकेचे विधिज्ञ एस.एस.गायकवाड, व रिकव्हरी अधिकारी आदित्य गवळी व बैंक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजिव कुमार व बैंकेचे विधिज्ञ श्रीमती व्ही.ए.कुलकर्णी यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिवानी न्यायाधीश विरिष्ठ स्तर श्रीमती. एम.के.कोठुळे यांनी केले.
सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून एकुण 4 हजार 916 प्रलंबित प्रकरणे दाखल केली व 22 हजार 404 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणामधील तडजोड मुल्य 1,49,18,63,016 (एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ठ हजार सोळा ) इतके राहिले.
सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयांमध्ये 15 वर्षे जुनी 01, 10 वर्षे जुनी 11,  5 वर्षे जुनी 951 अशी एकुण 963 जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापुर्वी दिनांक 5 मे 2025 ते 9 मे 2025 या कालावधीमध्ये मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये 15 वर्षे जुनी 9,  10 वर्षे जुनी 46, 5 वर्षे जुनी 527 अशी एकुण 4 हजार 82 इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली.
000000
Reactions

Post a Comment

0 Comments