Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात कराडच्या मुलाची एंट्री, फोन करून पोलिसांवर तक्रार न घेण्यास दबाव

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात कराडच्या मुलाची एंट्री, फोन करून पोलिसांवर तक्रार न घेण्यास दबाव 


 बीड(कटूसत्य वृत्त):- बीडमधून दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केल्याच्या घटनेनंतर तसाच प्रकार बीडमध्ये घडला आहे. आता बीड जिल्ह्याच्या परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण घोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेने पूर्ण जिल्ोठी खळबळ उडाली आहे. दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. हे व्हिडिओमधून समोर आलं आहे. याप्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाने फोन केल्यामुळे पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप पीडित योगीराज गित्ते यांनी केला आहे. परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यातील पाच आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे ( रा. डाबी ), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी 10 आरोपी अद्यापही फरार आहेत. या मारहाण प्रकरणातील आरोपी टोळीचा मोरक्या अदित्य बाबासाहेब गित्ते व सचिन विष्णू मुंडे यांच्यासह इतर दोन व्यक्तीने योगीराज अशोक गित्ते यांना अमानुष मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. मारहाण झाल्यानंतर पीडित योगीराज गित्ते हा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेला. मात्र, त्याची तक्रार घेऊ नये यासाठी वाल्मीक कराडचा छोटा मुलगा श्रीगणेश वाल्मीक कराड याने परळी पोलीस ठाण्यात कॉल करून तक्रार घेऊ नका असे सांगितले. त्यामुळे, परळी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments