धार्मिक क्षेत्रातील नवी संकल्पना, दृष्टिकोन आणि तीर्थक्षेत्र विकासाचे मार्गदर्शक- निखिल गडकरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

धार्मिक क्षेत्रातील नवी संकल्पना, दृष्टिकोन आणि तीर्थक्षेत्र विकासाचे मार्गदर्शक- निखिल गडकरी

 धार्मिक क्षेत्रातील नवी संकल्पना, दृष्टिकोन आणि तीर्थक्षेत्र विकासाचे मार्गदर्शक- निखिल गडकरी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली न्यास हे धार्मिक क्षेत्रातील नवी संकल्पना, दृष्टिकोन आणि तीर्थक्षेत्र विकासाचे मार्गदर्शक असल्याचे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जनसंपर्क अधिकारी अनिल विपत, बाळासाहेब मोरे, नन्नु कोरबू यांच्यासह न्यासाचे बाळासाहेब पोळ, प्रवीण घाटगे, निखिल पाटील, विजय माने, बाळासाहेब घाटगे, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, रोहित कदम, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages