सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

 सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हापालिकेच्या वतीने अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये सात दिवसांत 56 बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत. 
अग्निशमन सुविधा नसलेल्या तब्बल 382 इमारती आढळल्या आहेत.
50 इमारतींचा वापर बेकायदा राहण्यासाठी केला जात असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले. केलेल्या पाहणीत नव्याने चार बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत.

एमआयडीसी मधील कारखान्याला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमिवर महापालिकेचा नगररचना विभाग, अग्निशमन दल आणि कर संकलन विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे. 22 मेपासून सर्वेक्षण सुरू आहे. सात दिवसांच्या सर्वेक्षणामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. आतापर्यंत 764 इमारतींची पाहणी केली आहे. यात 50 ठिकाणी अनधिकृत बांधकामे दिसून आली. सामासिक अंतर अवैध वापर असलेल्या 600 इमारती आढळून आल्या. मिश्र वापराच्या 175 इमारती आणि अग्निशमन सुविधा नसलेल्या 382 इमारती आढळून आल्या. अर्धवट अग्निशमन सुविधा असलेल्या 364 इमारती दिसल्या. केवळ 18 इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा आढळून आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages