पंढरपूरच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट; माळशिरस तालुक्यात कोरोनाची एंट्री - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

पंढरपूरच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट; माळशिरस तालुक्यात कोरोनाची एंट्री

 पंढरपूरच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट; माळशिरस तालुक्यात कोरोनाची एंट्री  



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यात अनेक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आता पंढरीच्या वेशीवर येऊ ठेपला आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माळीनगर येथे दोन नवे कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आषाढी वारीवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. या नव्या संकटामुळे आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे.

जगात कोरोनाची महामारी पसरल्यानंतर २०२० व २०२१ या दोन वर्षात या महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर महामारी कमी झाली असताना कोरोनाचे नवीन व्हेरिएन्ट आले. मात्र यातून जग सावरत असताना आता पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान कल्याणमध्ये कोरोनामुळे दोघांना मृत्यू देखील झाला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्र अलर्ट झाली आहे.

आषाढी वारीवर कोरोनाचे सावट दरम्यान आषाढी एकादशीसाठी येत्या १८ जून रोजी संत तुकाराम महाराज तर १९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. तर येत्या ६ जुलैला आषाढीचा मुख्य सोहळा पंढपुरात साजरा होणार आहे. आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात. मात्र माळशिरस तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने आषाढी वारीवर कोरोनाचे सावट पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार आता संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अकलूज आणि माळीनगर या गावात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. या दोन्ही संशयित कोरोना बाधीत रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती माळशिरसच्या वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages