डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित झाली- दिपकआबा साळुंखे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 16, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित झाली- दिपकआबा साळुंखे पाटील

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित झाली- दिपकआबा साळुंखे पाटील



 



सांगोला (कटूसत्य वृत्त):- डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आपल्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे भूषण होते. आपल्या हयातीत त्यांनी दीन, दलित, उपेक्षित आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आज समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित झाली आहे असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. जवळा ता सांगोला येथील जुना राजवाडा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना ते बोलत होते. 
यावेळी माजी सभापती साहेबराव देशमुख जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांच्यासह ग्रामस्थ आहे समाजबांधव उपस्थित होते. 

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली जनजागृती महत्वाची ठरली आणि स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले योगदान दिले वेशीच्या बाहेर ज्यांनी आपली हयात उपेक्षित आणि वंचित म्हणून घालवली आज त्यांचेच वारस राजाच्या हवेलीप्रमाणे गावकुसात स्वाभिमानाने जीवन जगत आहेत हे सर्व श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, निवृत्त पोलीस अधिकारी भरत शेळके आदी उपस्थित होते.


चौकट ; 

सांगोला तालुक्याशी डॉ बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे सबंध..! 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सांगोला तालुक्यातील तत्कालीन अनेक लोकांशी जवळचे संबंध होते. बलवडी येथील लिगाडे सरकार परिवाराचे आणि कोळा येथील अनेक लोकांशी त्यांचे संबंध होते. म्हणूनच कोळा येथे त्यांचा वारसा जतन करण्यासाठी अस्थीकलश ठेवण्यात आले आहेत. यामधून आजही अनेकाना प्रेरणा मिळते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages