कुर्डूवाडीत डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- शहरातील शासकीय,निमशासकीय कार्यालये,शाळा महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुर्डूवाडी शहरासह विस्तारित भागात मोठमोठी शामियाने उभी करून फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले यानंतर येथील रवी आठवले युवा मंचच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन सरपंच पृथ्वीराज पाटील डॉ.सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरास शहरातून भरभरुन प्रतिसाद मिळाला. मंगळवार दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता तमाम भीम सैनिकांना अन्नदानाचे वाटप करण्यात येणार असुन सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आठवले यांनी केले.
यावेळी रवी आठवले दत्ता गवळी फिरोज खान शंकर बागल हमीद शिकलकर रवी सुसलादे इसाक अत्तार हंबीरराव गोरे सोहेल तांबोळी निलेश गवळी महेश पाटणे नितीन गोरे पापामिया शेख शाहनवाज शेख सिद्धार्थ झिंगळे अमर जगताप मुज्जमिल शेख मोहन लोंढे अमन सुळ आदी उपस्थित होते.
0 Comments