टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील परीते जवळ २५ लाखांचा गुटखा जप्त
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात अवैध गुटख्याने थैमान घातले असल्याने अवैद्य गुटखा जप्त करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून अवैद्य मार्गाने सांगोल्या कडून टेंभुर्णी कडे गुटखा घेऊन निघालेला पिकअप परिते गावच्या हद्दीत असलेल्या शेळके धाब्या जवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन २५ लाख २३ हजार सातशे साठ रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेऊन चार संशयित आरोपीच्या विरोधात काल सायंकाळी उशिरा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई माढा तालुक्यातील टेंभुर्णी पंढरपूर रोडवर असलेल्या टेंभुर्णी पासून 12 किलोमीटर अंतरावर परिते हद्दीतील शेळके दहाव्या समोर येथे काल सायंकाळी ८ वाजण्याचा सुमारास कारवाई केली सांगोला पंढरपूर कडून येणारे. पिकअप क्रमांक एम.एच. ४५ ए. एफ. २३०७ या वाहनातून सांगोला येथून पंढरपूर वरून टेंभुर्णी कडे अवैध मार्गाने गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांचा आदेशाने टेंभुर्णी पोलिसांना माहिती देण्यात आली हाती. पंढरपूर- टेंभुर्णी मार्गांवरील परिते हद्दीतील शेळकेवाडा हॉटेल येथे पोलिसांनी सदर पिकअप ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासनास कळवून. अशोक यमनप्पा इलागेर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी संशित आरोपी संतोष मोहन नकाते, वय 25 वर्षे, वाहन चालक, रा. मु. पो. अकोला, ता. सांगोला, अनिल सुखदेव बेहरे, वय 30 वर्षे, रा. बेहरेचिंचोली, ता. सांगोला, अवैद्य साठा मालक अभि म्हस्के, वाहन मालक संभाजी अमसिद्ध बन्ने यांचा विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून
यामध्ये विमल पानमसाला एकूण किंमत ३ लाख ७४ हजार ४००, व्ही १ सुगंधित तंबाखू एकूण किंमत ९३ हजार ६००, विमल पानमसाला १० लाख ८९ हजार रुपये, व्ही 1 सुगंधित तंबाखू १ लाख २१ हजार रुपये, विमल पानमसाला ३८ हजार ८९६ रुपये,व्ही 1 सुगंधित तंबाखू ६ हजार ८६४, आरएमडी पानमसाल १ लाख ८० हजार रुपये, एक सुगंधिततंबाखू १ लाख २० हजार रुपये, असे एकूण २० लाख २३ हजार ७६० रुपये मुद्देमाल जप्त वाहन किंमत ५ लाख रुपये एकूण २५लाख २३ हजार ७६०रुपये जप्त करून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करत आहेत. या घटनेमुळे माढा तालुक्यातील अवैद्य आदित्य अनेक दुकानांमध्ये आर एम डी विमल व सुगंधी तंबाखू मिक्स करून मावा जोरदार विकला जात असून या होलसेल विकणारे माढा तालुक्यातला खुरपाई जिवलदार होत असल्याचे समजते आता यांच्या वरती पण कारवाई होणार काय ? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
0 Comments