नीरा देवधर पाण्यातून सांगोला - पंढरपूर मतदार संघासाठी एक टी एम सी वाढीव पाणी मंजूर -ॲड.शहाजीबापू पाटील. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 19, 2025

नीरा देवधर पाण्यातून सांगोला - पंढरपूर मतदार संघासाठी एक टी एम सी वाढीव पाणी मंजूर -ॲड.शहाजीबापू पाटील.

 नीरा देवधर पाण्यातून सांगोला - पंढरपूर मतदार संघासाठी एक टी एम सी वाढीव पाणी मंजूर -ॲड.शहाजीबापू पाटील.



नीरा-देवधरचा सांगोला-पंढरपूर मतदार संघातील कॅनॉल होणार बारमाही 


सांगोला (कटूसत्य वृत्त):- निरा देवधर योजनेतून सांगोला पंढरपूर मतदार संघासाठी एक टी एम सी वाढीव पाणी मंजूर करण्याचा निर्णय बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी मंत्रालयांमध्ये झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याची माहिती माजी आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली यावेळी बैठकीमध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे,माजी खा. रणजितसिंह निंबाळकर, आ.बाबासाहेब देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, जलसंपदा सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.माजी आमदार शहाजीबापू पाटील व आ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीवरून धरण क्षेत्रातून बंदिस्त पाईपलाईन करून मैल क्र 95 येथे एक टी एम सी पाणी थेट कॅनॉल मध्ये सोडण्याचा निर्णय होऊन तातडीने याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आसल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.लवकरच या कामास सुरुवात केली जाणार असून त्यामुळे सांगोला व पंढरपूर मतदारसंघात निरा उजवा कालवा हा बारमाही होणार असल्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याची माहिती माजी आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages