Hot Posts

6/recent/ticker-posts

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जीवन सुकर जरी असली तरी गुंतागुंतीचे होवू लागते: तुषार क्षिरसागर

 कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जीवन सुकर जरी असली तरी गुंतागुंतीचे होवू लागते: तुषार क्षिरसागर




 बार्शी (कटूसत्य वृत्त):-
 इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे कित्येक कामे बटनाद्वारे सहज पद्धतीने होवू लागली आहेत. पण दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता गुंतागुंतीची पण होवू शकते, असे प्रतिपादन तुषार क्षिरसागर यांनी केले. ते सध्या ईटन टेक्नॉलॉजी पुणे येथे मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील कर्मवीर स्पर्धा मार्गदर्शन केंद्राद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक डॉ. राहुल पालके व डॉ राहुल पालके हे उपस्थित होते.
 पुढे बोलताना क्षिरसागर म्हणाले, आय टी कंपन्यामध्ये सॉफ्टवेअर क्रिएशनचा उद्देश उत्पादकता वाढविण्यासाठी होतो. त्यासाठी को पायलट, डीप सीक, जेमिनी, गुगल अलेक्सा असे वेगवेगळे ॲप्स वापरून कंपन्या युजर कंर्फेट डाटा तयार करतात.त्यांनी एआयचे फायदे सांगताना, शैक्षणिक क्षेत्रात त्याचा कसा उपयोग होतो.सारांश रूपाने लेखन, प्रोग्रॅमिंग कोड, चॅट जीपीटी, इंग्लिश स्पीकिंग कोर्स,वाक्याचे रसग्रहण, रिझ्यूम मार्केटमध्ये उपयुक्तता, इंटरव्यूव्ह यांचे महत्त्व विशद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डेटा प्रायव्हसी, डेटा चोरी, डेटा सिक्युरिटी, डीपफेक असे प्रश्न निर्माण होवू लागले आहेत. याप्रसंगी डॉ. राहुल पालके यांनी स्पर्धा परीक्षेत याविषयाची उपयुक्तता सांगितली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक क्षेत्रात सुयोग्य वापर करून विकासाची कास धरावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments