Hot Posts

6/recent/ticker-posts

कॅन्सरग्रस्त बैलाच्या शिंगावर केली तब्बल चार तास शस्त्रक्रिया.

 कॅन्सरग्रस्त बैलाच्या शिंगावर केली तब्बल चार तास शस्त्रक्रिया.



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावांमध्ये मधील शेतकरी सिद्धाराम भोसले यांच्या बैलाच्या उजव्या शिंगाला कॅन्सर झाल्यामुळे राहत ऍनिमल च्या डॉक्टरांनी तब्बल चार तास शस्त्रक्रिया करून या बैलाचे शिंग काढून टाकले शिंग काढल्यामुळे आता या बैलाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भोसले यांच्या मालकीच्या या बैलाच्या सदर शिंगा मधून सतत सिंग हलणे, रक्त , घाण पू, वाहत असल्यामुळे बैलाच्या जवळ गेले की दुर्गंधी येत होती . पण बैलाला नेमका काय आजार झाला आहे याचं निदान होत नव्हते. यासंदर्भात ऍनिमल रहस्य डॉक्टरांना कळविले व त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला सांगितले की या बैलांच्या शिंगाला कॅन्सर झालेला आहे हे सिंग मुळापासून कापून काढणे गरजेचे आहे. असा सल्ला दिल्यामुळे त्यांनी त्वरित बैलाच्या शिंगावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करत ही शिंग काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केल्यामुळे सदर बैलाचे प्राण वाचले आहेत.
 सिद्धाराम भोसले यांचा तो बैल वृद्ध झाल्याने त्याला शेतकामाला जुंपत नव्हते. पण त्यांच्या आरोग्याची काळजी नेहमी  भोसले हे घेत होते. बैलाला अनेक दिवसांपासून वैरण खाता येत नव्हती, बैलाची शिंगे खाली वाकली होती. आपल्या लाडक्या बैलाला होत असलेला त्रास डोळ्याला बघवत नव्हता. पण त्याच्या आजारावर उपाय सापडत नसल्याने भोसले कुटुंब हतबल झाले होते.  बैलाचा त्रास पाहावेसा न झाल्याने याबाबतची माहिती भोसले यांनी ॲनिमल राहत या संस्थेला दिली. माहिती मिळताच अजित मोठे यांनी पाहणी केली. 
घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांच्याबरोबर संपूर्ण बैलाची आणि शिंगाची पाहणी केली. डॉ.जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चार तास सदर कॅन्सरग्रस्त बैलाच्या शिंगावर सर्जरी करीत शिंग कापून काढले. यासाठी डॉ. आकाश जाधव, भीमाशंकर, गणेश जावीर आणि बैल मालक भोसले यांनी परिश्रम घेतले. ॲनिमल राहत या संस्थेकडून या बैलाचे ऑपरेशन मोफत करण्यात आले आहे. ऑपरेशन झाल्यावर बैल मालक सिद्धाराम भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

चौकट
 मुख्य जित्राब म्हणूनच त्याने सहन केलं..l
बैलाच्या शिंगाला कॅन्सर झाला आहे हे आम्हाला कळलंच नाही. कारण त्याची काहीच लक्षण दिसून येत नव्हती मात्र बैल वैरण खात नव्हता. सतत आजारी असल्यासारखा राहायचा. पण जेव्हा त्याच्या शिंगाला कॅन्सर झाला आहे हे कळलं तेव्हा मात्र आम्हाला खूप वाईट वाटलं. कारण गेल्या पंधरा --- सोळा वर्षापासून आमच्या संसाराला हातभार लावणाऱ्या या बैलाला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. त्याला किती वेदना झाल्या असतील याचा अंदाज न लावलेलाच बरा. कारण ते मुक जित्राब आहे. म्हणून त्यानं सहन केलं. त्याला वेदना सांगता येत नव्हत्या. आरडा ओरड करता येत नव्हता. सारं मुकाट्यानं सहन करणाऱ्या माझ्या या लाडक्या बैलाची आज मात्र वेदनेतून सुटका झाली आहे आणि त्याला राहत ॲनिमल च्या डॉक्टर टीममुळे जीवदान मिळाल आहे.
भोसले कुटुंब पाकणी तालुका उत्तर सोलापूर.
Reactions

Post a Comment

0 Comments