Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमनपदी ऋतुजा मोरे तर व्हॉ.चेअरमनपदी वर्षा दावडा

 शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमनपदी ऋतुजा मोरे तर व्हॉ.चेअरमनपदी वर्षा दावडा




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-  शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या शिवप्रसाद अर्बन वुमन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नातेपुते या संस्थेच्या बिनविरोध निवडी पार पडल्या. शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमनपदी ऋतुजा शरद मोरे तर व्हा. चेअरमन वर्षा विरेंद्र दावडा यांच्या निवडी करण्यात आल्या. या निवडीवेळी संचालिका अश्विनी रमेश मोरे, प्रियांका वैभव मोरे, शैला सुशांत पाटील, आयेशा हारुण मुलाणी, पल्लवी नानासाहेब बनसोडे, मनीषा सचिन पवार, सारिका विनोद दोशी, आशा महादेव चिकणे, संगीता सतीश चांगण यांची उपस्थिती होती. निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सम्राट पाटील यांनी मॅनेजर रोहित कोतमिरे यांच्या साह्याने कामकाज पाहिले. सचिव सुशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments