डायल ११२ला केला खोटा कॉल; ठाण्यात गुन्हा दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 2, 2025

डायल ११२ला केला खोटा कॉल; ठाण्यात गुन्हा दाखल

 डायल ११२ला केला खोटा कॉल; ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-डॉयल ११२ला कॉल करून 'भावानं मर्डर केल्याची खोटी माहिती दिली' पोलिसांनी शहानिशा केल्यावर अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. असा कॉल करणाऱ्या विनायक विलास गायकवाड (रा. निवारानगर, सोलापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २१७ अन्वये एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अशी माहिती देणारा कॉल केल्यास एक वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सोमनाथ वाघमारे हे २७ मार्च रोजी पीसीआर मोबाइल १ मध्ये कर्तव्यावर होते. त्यांना मध्यरात्री रोजी १:४८ वाजता. डायल ११२ वरून कॉल आला की, 'गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी, सोलापूर येथे फोन करणारा व्यक्ती घटनास्थळी असून, त्याच्या भावाने मर्डर केला आहे' त्यावर ते गणेश टेक्सटाईल्स, एमआयडीसी, सोलापूर येथे गेले. तेथे कॉल करणारा विनायक विलास गायकवाड (रा. १२९, निवारानगर, सिद्ध हनुमान मंदिराजवळ, सोलापूर) हा मिळून आला. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मीच डायल ११२ला कॉल केला होता, असे सांगितले. त्यानुसार त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली. त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून संबंधित व्यक्तीने डायल ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २१७ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages