पाच शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन समांतर जलवाहिनीचे काम सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 2, 2025

पाच शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन समांतर जलवाहिनीचे काम सुरू

 पाच शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन समांतर जलवाहिनीचे काम सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी (स्मार्ट सिटी) ने उजनी धरणाजवळ मंगळवारी पोलिस बंदोबस्तात समांतर जलवाहिनीचे काम सुरू केले. या कामात पाच शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या शेतकऱ्यांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या शेतकऱ्यांच्या शेतात खोदाई जेसीबीने खोदाई सुरू झाली. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे ११० किलोमीटरपैकी १५०० मीटरचे काम बाकी आहे. उजनी धरणाजवळ तीन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाइपलाइन टाकावी लागणार आहे. या शेतकऱ्यांना स्मार्ट सिटी कंपनीने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. नुकसानभरपाईची रक्कम कमी असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या शेतकऱ्यांनी कामास विरोध केला. परंतु, स्मार्ट सिटी कंपनीने पोलिस बंदोबस्तात मंगळवारी कामाला सुरुवात केली. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील मंगळवारी सकाळी कामाच्या • ठिकाणी हजर झाले. स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, जीवन प्राधिकरणचे एम. हरिश, के. नदाफ व इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकरी कुटुंबीयांची तीव्र नाराजी पोलिस बंदोबस्तात उभ्या पिकातून जेसीबीने खोदाई सुरू झाली. यावेळी सुरेश गोरे, राजेंद्र गोरे, पृथ्वीराज गोरे, निलेश यादव, ओंकार यादव यांनी कामाला विरोध केला. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेउन गाडीत बसविले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी विरोध केला. परंतु, पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत माघार घेतली. त्यानंतर ठेकेदाराने खोदाई सुरू केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages