Hot Posts

6/recent/ticker-posts

अर्थसंकल्पातून करमाळ्याला दमडाही मिळाला नाही

 अर्थसंकल्पातून करमाळ्याला दमडाही मिळाला नाही

करमाळा  (कटूसत्य वृत्त):-नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करमाळा मतदारसंघासाठी आमदार नारायण पाटलांना दमडी देखील मिळविता आली नाही, अशी टीका माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने पारेवाडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना मा आ. संजयमामा म्हणाले की, मार्च महिन्यातील अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो. त्यामध्ये वर्षभरातील निधीचे नियोजन होत असते. पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीला मर्यादा असते, असे असतानाही चालू अर्थसंकल्पात करमाळा मतदारसंघासाठी पारेवाडी : येथील जाहीर सभेत बोलताना मा. आ. संजयमामा शिंदे दिसत आहेत. नारायण पाटलांना दमडी देखील मिळविता आली नाही. यावरूनच त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वकुब जनतेच्या पुन्हा एकवार लक्षात आलेला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर हे झालेलं पहिलेच असे अधिवेशन आहे की ज्यामध्ये या मतदारसंघाला विकासकामांसाठी शब्दशः रुपयादेखील विद्यमान आमदार मिळवू शकलेले नाहीत. आपल्या कार्यकाळात आणलेली बहुसंख्य विकासकामे, प्रकल्प आदी कामे सध्या जोमाने सुरू असताना केवळ त्या कामांमध्ये टक्केवारी मिळण्यासाठी ही कामे बंद पाडणे, अडथळे निर्माण करणे असे उद्योग नारायण पाटील व त्यांचे साथीदार करत आहेत. दहिगाव योजनेचे पाईप कोणी जाळले, कोणाच्या सांगण्यावरून गेले तीन महिने हे काम बंद पाडण्यात आले, हे आता जगजाहीर झालेले आहे, असे संजयमामा म्हणाले. राजकारण हा त्यांचा पहिल्यापासूनच पोट भरण्याचा धंदा आहे हे ही जनतेला ठावूक आहे. त्यामुळे आमदार या नात्याने शासन दरबारी तुमची पत दाखवून विकासकामांसाठी निधी आणा आणि मग त्यात चमच्याने नव्हे तर बचक मारून पैसे खा, पण सुरू असलेली विकासकामे बंद पाडण्याचे दुष्कर्म करून शेतकरी, सामान्य जनतेचा तळतळाट घेऊ नका, अशी जोरदार टीका संजयमामांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments