Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन्ही 'राष्ट्रवादी'च्या परस्पर विरोधी भूमिका

 दोन्ही 'राष्ट्रवादी'च्या परस्पर विरोधी भूमिका

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. नुकतीच उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली आहे. त्यामुळे आता अर्ज माघारकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्ज माघारीनंतरच कोण, कोणाच्या विरोधात लढणार आणि कोणाची काय भूमिका असणार? हे स्पष्ट होणार आहे. सध्या बाजार समितीमध्ये भाजपा सत्ताधारी पक्ष आहे. राज्याच्या राजकारणात भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्रित आहेत. मात्र सोलापूर बाजार समितीच्या निवणूकीत मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाची परस्पर विरोधी भूमिका दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि भाजपाने एकत्रित येवून समविचारी लोकांना सोबत घेवून पॅनल तयार करण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतल. मात्र त्यांना शिवसेना उध्दव ठाकरे गट, सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेतेमंडळी मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपाच्या पॅनल सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अनुकुल असल्याचे दिसून ये आहे. त्यांनी यावेळी स्वतः उमेदवारी अर्ज भरलेला आहे. एकेकाळचे साठे यांचे समर्थक माजी संचालक अविनाश मार्तंडे यांनी माजी आमदार माने यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. मोहोळचे आमदार राजू खरे यांनी माजी आमदार माने यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा भाजपाच्या पॅनलला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते माजी नगरसेवक किसन जाधव यांची माने गटाशी जवळीकता वाढली आहे. त्यामुळे ते भाजपा विरोधी भूमिका घेत माने यांच्या पॅनलमध्ये सामील होतील, अशी परिस्थिती दिसून येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments