साने गुरुजी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुरलीधर कडलासकर तर उपाध्यक्षपदी जयंत गायकवाड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुरलीधर कडलासकर यांची तर उपाध्यपदी जयंत गायकवाड यांची निवड झाल्याची माहीती पतसंस्थेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी दिली.
निवडणुक निर्णय अधिकारी राजु ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडली.यावेळी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.पतसंस्थेच्या संचालकाच्यावतीने नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे सचिव आप्पाराव इटेकर,संचालक विरभद्र यादवाड, भिमराया कापसे,सचिन चौधरी,धनाजी मोरे,उल्हास बिराजदार ,शिवानंद हिरेमठ,महादेवी पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments