छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने पहेलगाम येथील हल्ल्याचा केला निषेध व्यक्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथील निष्पाप भारतीय पर्यटकांना आतंकवाद्यांनी जीव घेतला. या भ्याड कृत्याचा निषेध आणि मृत भारतीय बांधवांना विजापूर वेस येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या भ्याड कृत्याचा मेणबत्ती पेटवून आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आले समस्त मुस्लिम मावळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले. आम्ही सारे भारतीय एकोप्याने आणि बंधुत्व जपणारे आहोत, भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली.
या प्रसंगी आयोजक तथा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, राम गायकवाड, पोपट भोसले, बशीर सय्यद रिजवान दंडोती तन्वीर गुलजार कादर भागानगरी कय्युम मोहळकर अशफाक बागवान वाहिद तांबोळी हारिस शेख बाबा शेख जावेद बद्दी रिजवान सर नईम करनूल खाशिम बेलीफ गफूरभाई बागवान यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
0 Comments