गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 25, 2025

गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 गोपाळपुर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न


 

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुका विधी सेवा समिती, व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विदयमाने किमान समान शिबीराअंतर्गत गोपाळपुर ग्रामपंचायत (ता.पंढरपूर) येथे तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. खंडाळे, पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी न्यायाधीश ए. ए. खंडाळे, यांनी उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक जनजागृती करुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी मार्गदर्शन केले. तसेच अॅड. आर.ए. पुजारी यांनी गावक-यांना बाल मजुर कायदेविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

तत्पुर्वी कायदेविषयक शिबीराची प्रस्ताविका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. आर. बी. चौगुले यांनी केले, तर सुत्रसंचालन अधिवक्ता संघाचे सचिव अॅड. ए.एम. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अॅड. गणेश चव्हाण यांनी मानले.

सदर शिबीरास वकिल संघाचे सदस्य अॅड. शितल असबे, अॅड. एम. ए. नळे, तसेच विधी स्वयंसेवक, अॅड. वाघमारे, नंदकुमार देशपांडे, सुनील यारगट्टीकर, पांडुरंग अल्लापुरकर, तसेच न्यायालयीन कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages