Hot Posts

6/recent/ticker-posts

२६ मे पासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होणार?

 २६ मे पासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होणार?




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरकरांची आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २६ मे २०२५ पासून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, फ्लाय ९१ या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून २६ मे २०५ रोजी पासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मागील काहीं वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामधील अनेक मंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील आश्वासन दिले होते. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल असे कळविले होते.

दरम्यान मध्यंतरी सोलापूर - गोवा, सोलापूर- मुंबई व सोलापूर - हैदराबाद या तिन्हीही मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते मात्र तूर्तास तरी सोलापूर ते गोवा ही विमानसेवा २५ मे पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments