ऑनलाईन जुगाराच्या नादात तरूणाई होतेय बर्बाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 25, 2025

ऑनलाईन जुगाराच्या नादात तरूणाई होतेय बर्बाद

 ऑनलाईन जुगाराच्या नादात तरूणाई होतेय बर्बाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आॅनलाईन गेमींग पासून लांब राहा. त्यात आर्थिक जोखीम आहे असं वारंवार सांगून ही अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेले दिसतात. यातून काही तरूण अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. त्यांचे पुर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. असा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डवाडीतल्या तरुणाबरोबर घडल्याचे समोर आले आहे. या तरुणाने ऑनलाईन जुगारात  ९० लाख रूपये, ६ एकर जमीन, २ तोळे सोने गमावलं आहे. आता हरलो पुढच्या वेळी जिंकेल या नादात त्यांनी सर्व संपत्ती हातची गमावली आहे. आता त्याल रस्त्यावर येण्या शिवाय पर्याय राहीला नाही. 

बालाजी खरे असे या तरुणाचे नाव असून त्याचे शिक्षण आठवी पर्यंत झाले आहे. त्याच्या कुटुंबात ९ जण आहेत. घरातली ही लोक बाहेर कामाला जातात. घरची १२ एकर शेती होती. जुगारा पोटी ही शेती त्याने हळूहळू विकली. गेल्या दोन वर्षापासून तो हा ऑनलाईन जुगार खेळत आहे. दिवसभर त्यासाठी तो मोबाईलवर असायचा. पण त्याला त्यात कधी पैसे मिळाले नाहीत. उलट त्याला पैसे गमावण्याची वेळ आली. 
‘चक्री गेम' हा एक ऑनलाईन जुगाराचा प्रकार आहे, ज्यामध्ये खेळाडूंना झटपट पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले जाते. परंतु, अनेक वेळा हे आमिष फसवणुकीत परिवर्तित होते, ज्यामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडतात. बालाजी याने हा गेम खेळण्यासाठी एजंटना लाखो रुपये दिले आहेत. हा खेल खेळण्या पूर्वी त्याला पैसे या एजंटला द्यावे लागत होते. ते पैसे तो ऑनलाईन ट्रान्स्फर करायचा. त्यानंतर त्याला हा गेम खेळता येत होता. नेहमी पैसे गमावणाऱ्या बालाजीला आपण एक दिवस जिंकू आणि गेलेले पैसे आपल्याला परत मिळतील या आशेने तो खेळत राहीला. गेलेले पैसे सोडा होते तेवढे पैसे जमीन ही त्याने या नादात गमावली आहे. 
या प्रकरणानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. स्थानिक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

फनरेप व चक्री या ऑनलाइन जुगारामुळे शहर व परिसरातील अनेक तरुण व त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. मात्र या ऑनलाइन जुगाराला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असून त्यामुळेच हा व्यवसाय बंद होण्याऐवजी जोर धरू लागल्याने अनेकांना चिंता लागली आहे.

 कुर्डुवाडी शहरातील संतोष शेंडे व शंकर बागल या दोघांनी थेट पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची समक्ष भेट घेऊन या ऑनलाइन जुगारावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. यावेळी लऊळ (ता. माढा) येथील ऑनलाइन चक्री जुगारात पैसे गमावलेला तरुणही सोबत होता.
लऊळ येथील तरुणाने या ऑनलाइन जुगारात लाखो रुपये गमावल्याची बातमी सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून या तरुणाच्या झालेल्या नुकसानीचा तपास करून त्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
कुडूवाडी शहरात ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून हे सुरू असून शहर व परिसरातील अनेक तरुण या चक्री जुगाराच्या आहारी गेले आहेत.
त्यांच्या कुटुंबावर मोठा ताण आला आहे. अनेक युवक आर्थिक व मानसिकदृष्ट्या बरबाद झाले आहेत.
ऑनलाइन चक्री जुगारात गुंतलेले एजंट शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, लऊळ येथील तरुणाच्या झालेल्या नुकसानीचा तपास करून त्याला न्याय मिळवून द्यावा व नागरिकांमध्ये जनजागृती करून या प्रकारच्या जुगारांपासून दूर राहण्यासाठी मोहिमा राबवाव्यात, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages