Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिनाथ निवडणुकीत रंगत; तिरंगी लढत होणार

 आदिनाथ निवडणुकीत रंगत; तिरंगी लढत होणार

आजी - माजी आमदारांसह झोळ गट रिंगणात

करमाळा (कटूसत्य वृत्त):-बंद स्थितीत असल्याने बिनविरोध होण्याची अपेक्षा असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांमध्ये समन्वय साधला न गेल्याने महायुती, महाविकास आघाडी आणि झोळ गट अशा तीन गटांच्या उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्या निवडणुकीला रंगत आली आहे. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ६२ उमेदवार या निवडणुकीत उतरले आहेत.

एकेकाळी तालुक्याची शान म्हणून ओळखल्या गेलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. बंद असलेल्या आदीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी तब्बल २७२ अर्ज दाखल होऊन छाननीत ते मंजूरही झाले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असा अंदाज होताच. मात्र बागल गटाने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर काही दिवसांनी माजी आ. जयवंतराव जगताप यांनीही निवडणुकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. मात्र आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, आणि प्रा. रामदास झोळ या नेत्यांमध्ये समन्वय साधला न गेल्याने ही लढत तिरंगी होत आहे. दरम्यान, गुरुवार अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली

Reactions

Post a Comment

0 Comments