Hot Posts

6/recent/ticker-posts

बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार

 बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-माजी आमदार दिलीप माने, माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. ती हरकत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी फेटाळली आहे. त्यामुळे माने, हसापुरेंसह ४३८ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. दरम्यान, माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्याने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवारांचे ४३८ अर्ज मंजूर केले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्जाची छाननी पार पडली आहे. दोन ते १६ एप्रिलदरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या कालावधीत किती उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतात. त्यावरून बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार उतरणार, हे स्पष्ट होणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ४७९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ४१ अर्ज अपात्र झाले आहेत. ३८८ उमेदवारांचे ४३८ उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जाची छाननी बाजार समितीच्या शिवदारे सभागृहात मंगळवारी (दि. १) रात्री उशिरापर्यंत चालली. त्यावेळी विविध अर्जावर हरकती घेण्यात आल्या. त्या हरकतीवर जिल्हा उपनिबंधक दरम्यान, बाजार समितीच्या गायकवाड यांनी सुनावणी घेऊन ३८८ निवडणुकीसाठी माजी आ. दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत. त्यातच आता माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी बाजार समितीची निवडणूक भाजप कार्यकर्त्यांसाठी लढवणार असल्याचे सांगितल्याने निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments