Hot Posts

6/recent/ticker-posts

दूषित पाण्यामुळे झालेली दुर्दैवी घटना पालिकेच्या हलगर्जीपणामुळे घडली- ॲड अनिल वासम

 दूषित पाण्यामुळे झालेली दुर्दैवी घटना पालिकेच्या हलगर्जीपणामुळे घडली- ॲड अनिल वासम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथे दोन शाळकरी मुले दगावली आहेत.ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉ.अमित मंचले यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरुद्ध निवेदने दिले,तक्रार व हरकती दिल्या तरीही सर्रास पालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक केली परिणामी आज बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथील दोन शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला.याला सर्वस्वी महापालिका प्रशासनाच जबाबदार आहेत. याचा जाहीर निषेध करण्यात आला.

या संबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य समिती सदस्य ॲड.अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉ अमित मंचले व नागरिक उपस्थित होते. 

यावेळी मागणी करताना म्हणाले की, दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी, नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोपचार द्यावे, स्वतंत्र पाण्याचे व ड्रेनिज ची लाइन करावे, ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तत्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावे, अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल.असा इशारा माकप चे राज्य समिती सदस्य ॲड अनिल वासम यांनी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments