मच्छरदाणीचा वापर कसा करावा हे सांगितले पाहिजे म्हणजे आपत्ती येणार नाही- प्रा. जयपाल पाटील
अलिबाग (कटूसत्य वृत्त):- महिलांच्या बाळंतपणासाठी आपत्ती येऊ नये म्हणून 102 रुग्णवाहिका, अवघडलेल्यावेळी आणि अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिका, महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांक याचा कायम वापर करून आपला आणि जनतेचा जीव वाचवण्याची मदत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या या मोफत योजनांचा वापर करावा त्याचबरोबर आपण रायगड जिल्ह्यातील खेडेगावात जात असल्याने कधी पाऊस आणि विजा कोसळतील हे माहीत नसल्याने आपल्या सुरक्षेसाठी आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाउनलोड करून घ्यावा असे आपल्या मार्गदर्शनात रायगड जिल्हा हिवताप कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत सांगितले. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर राजाराम भोसले, रायगड जिल्हा हिवताप अधिकारी, प्राध्या.जयपाल पाटील, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, प्रशांत घरत सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी रायगड, राजाराम कांबळे, आरोग्य निरीक्षक मयूर ठाकूर आरोग्य निरीक्षक, साक्षी शिगवणकर वैद्यकीय अधिकारी, अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रा. जयपाल पाटील यांचा परिचय करून रायगड जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर राजाराम भोसले यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉक्टर राजाराम भोसले, रायगड जिल्हा हिवताप अधिकारी यांनी करताना सांगितले की आपत्ती व्यवस्थापन याचे ज्ञान आपल्या कर्मचाऱ्यांना व्हावे म्हणून रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे जिल्ह्यातील ८११ ग्रामपंचायतीत सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम सुरू असून रायगड भूषण जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांच्याकडून आपल्या कर्मचाऱ्यांना माहिती घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित ठेवावे असे सांगितले. यावेळी जयपाल पाटील म्हणाले आपल्या खात्यातर्फे शेतकऱ्यांना डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी दिली जाते तिचा वापर करताना पहिल्यांदा ती पाण्यामध्ये धुवावी अशा सूचना कायम शेतकऱ्यांना देत रहा ज्यामुळे त्यांच्यावर आपत्ती येणार नाही, मोटार वाहने परवाना याची माहिती ही सुरक्षेच्या दृष्टीने सांगितली. महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर कसा करावा यासाठी दूरध्वनी करतात अलिबाग पोलीस ठाणे येथून महिला पोलीस हवालदार प्रियांका ठाकूर या येऊन त्यांनी 112 क्रमांक चा वापर कसा होतो याची माहिती दिली. आपण व आपले नातेवाईक बाळंतपणासाठीचे दिवस भरले असल्यास 102 व कठीण प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा केला पाहिजे याचे प्रात्यक्षिक देताना 102 क्रमांकाला फोन करतात 20 मिनिटात रायगड जिल्हा रुग्णालयातून महेंद्र म्हात्रे परिचारक बॉय आणि वाहन चालक मयूर पाटील रुग्णवाहिका घेऊन हजर झाले, त्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. महिला पोलीस आणि जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी यांचे स्वागत प्रशांत घरत सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी रायगड यांनी केले. या कार्यक्रमास वैभव कदम कीटक समाहरक, गणेश राठोड कीटक समारक, साक्षी वैद्यकीय अधिकारी, ओमकार महाले, सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर ठाकूर आरोग्य निरीक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन राजाराम कांबळे आरोग्य निरीक्षक यांनी मानले.
0 Comments