ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटलांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळ येथे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शाल, गुलाब पुष्प, आणि महाराष्ट्र राज्याचे जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी ही भेट घडवून आणली. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते शहाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, सरचिटणीस संतोष गायकवाड, माणिक कांबळे वसंत कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर यांची उपस्थिती होती. नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री असताना सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह प्रभाग 22 च्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचा योग शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे लाभला. त्यानिमित्त त्यांचे आभार देखील यावेळी किसन जाधव यांनी मानले. महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अडचणी, निधी संदर्भात आपण नेहमी सहकार्याची भूमिका दर्शविल्याची यावेळी नामदार विखे-पाटील म्हणाले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या दृष्टीने अग्रस्थानी आहे या पुढील काळात देखील महाराष्ट्र सरकारच्या सर्व लोककल्याणार्थ योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसन जाधव यांना दिली.

0 Comments