खंडित वीजपुरवठ्यामुळे 'दक्षिण' मधील शेतकरी त्रस्त
सोलापूर (कटुसत्य वृत्त):-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रप, अंत्रोळी, भंडारकवठे, वडापूर या भागांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा
वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसा आठ तास वीजपुरवठा नावालाच
असून सलग दोन तासही वीज मिळत नसल्याने उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे कठीण झाले विजेअभावी पिके करपू लागली आहे. पाण्याअभावी पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक शेतीपंपांसाठी वीजपुरवठा केला नुकसान होत आहे.
शेतीपंपांसाठी दर एका आठवड्यात विजेचे वेळापत्रक बदलले जाते. काही भागास सकाळी ८ ते दुपारी ४ दुपारी ४ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी ८ या तीन वेळेत जातो. ज्या भागात सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा होतो. त्या भागातील शेतकऱ्यांना सुरळीत आणि पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. पाणी असूनही विजेअभावी पाणी देणे शेतकऱ्यांसमोर आव्हान निर्माण केले आहे. वारंवार खंडित
होणान्या वीजपुरवठ्याबद्दल वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मुख्य
कार्यालयाकडूनच वीजपुरवठा बंद केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आठ तासांपैकी सलग दोन तासही वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करून शेतीपंपांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी केली जात आहे.
दक्षिण सोलापूरच्या मंद्रप भागातही अनेक ट्रान्स्फॉर्मरवर अनेक शेतीपंप चालविले जातात.
ओव्हरलोड शेतीपंपांमुळे एकाही शेतकऱ्याच्या शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज मिळत नाही. त्यामुळे विजेच्या मोटारी जळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ओव्हरलोड असलेल्या
ट्रान्स्फॉर्मरला पर्यायी नवीन ट्रान्स्फॉर्मरची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे केली आहे.
0 Comments