Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीच्या आमसभेत अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

 बार्शीच्या आमसभेत अधिकाऱ्यांची उडाली भंबेर






बार्शी (कटुसत्य वृत्त):- सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या विविध विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालय व शासनाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा खा. ओमराजे निंबाळकर व आ. दिलीप सोपल यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात बार्शी पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आम सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. शनिवारी सकाळी
११ ते रात्री ८ वाजेपर्यंत आमसभा झाली.
आमदार दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा पार पडली. या आमसभेला तहसीलदार एफ. आर. शेख, गटविकास अधिकारी महेश सुळे, बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नाकुल, पो. नि. बालाजी कुकडे, पो. नी. कुंदन गावडे. सपोनि दिलीप ढेरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, किशोर अंधारे, महिला बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नागेश अक्कलकोटे, नंदकुमार काशीद, गणेश जाधव, मुन्ना डमरे, निरंजन भूमकर, बापू सकपाळ यांच्या सह विविध खाते प्रमुख उपस्थित होते.
या आमसभेत शहर व तालुक्यातील नागरिकांनी चक्क अधिकारी व प्रशासनाबाबत
असलेल्या आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. बार्शी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे
तर अक्षरशः धिंडवडे काढले. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, वैराग येथील दुय्यम
निबंधक कार्यालयात सुरू असलेला भ्रष्टाचार, मृदू संधारण विभाग, लघुपाटबंधारे विभागाकडून
होणारी चालढकल, वीज वितरण कंपनीचा अंधाधुंद मनमानी कारभार, उजनी कालव्याचा
रखडलेला मावेजा, बार्शी नगरपालिकेचे पाणीपुरवठा करण्याकडे होणारे दुर्लक्ष, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, भूमी अभिलेख कार्यालय, बेकायदेशीर सुरू असलेली खडी क्रेशर यासह बार्शी शहर व तालुक्यातील सर्वच खात्यांची आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत सर्वसामान्य जनतेने चांगलीच हजेरी घेतली. त्यावर खासदार व आमदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तंबी देत चुकांवर पांघरून घालू नका, यापुढे लोकांच्या तक्रारी तातडीने सोडवा, आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर कोणाची गैर केली जाणार नाही, असा दम दिला.
बार्शीकर जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्याच्या बाबतीत कोणतीही हायगय न करता विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उर्वरित पाणीपुरवठा लाईन तातडीने जोडून घ्याव्यात, अतिक्रमण केलेल्या गाळ्यांना आपण वीज देता मग शेतकऱ्यांना सिंगल फेज देताना काय अडचण येते, ही अडचण दूर करा, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

चौकट १
गुटख्यांच्या पुड्या उधळल्या
बार्शी शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा विक्री प्रकरणामुळे सर्वसामान्य लोकांना
विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे सांगत येथील एका माहिती अधिकार
कार्यकर्त्यांनी भर आमसभेत व्यासपीठांसमोर जाऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष
गुटख्यांच्या पुड्या उधळल्या व गुटख्याच्या आकावर कारवाई करण्याची मागणी केली.
चौकट २
उत्तरे देताना आदिकार्यांना फुटला घाम
तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कारणावरून पाणीपुरवठा विभागाचे अजित वाघमारे यांनाही चांगलेच धारेवर धरले. बार्शी
विभागाचे वीज वितरण अधिकारी मांडके यांना तर लोकांच्या प्रश्नांची उतरे देताना अक्षरशः घाम फुटला. बार्शी नगरपालिकेला नगरोत्थान योजनेचे ८९ कोटी मिळवताना त्याचा २५ टक्के नगरपालिकेचा वाटा न भरता अनुदान लाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना उत्तर देताना फारच कसरत करावी लागली.
Reactions

Post a Comment

0 Comments