Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेच्या ४९६६ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

 महापालिकेच्या ४९६६ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश




सोलापूर (कटुसत्य वृत्त):- महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या ६३ महापालिकेच्या शाळांमधील ४ हजार ९६६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश दिले जाणार आहेत. तसेच सर्व माध्यमाच्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्याची परंपरा या वर्षीही कायम राखली जाणार आहे. त्यासाठीची तयारी बालभारती आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी गिरीश पंडित यांनी दिली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी महापालिका शिक्षण मंडळातील ६३ शाळा खासगी अनुदानित २६२ शाळा अशा एकूण ३२५ लाभार्थी शाळांना सहा माध्यमाच्या पात्र शाळेतील ७२ हजार ६२० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. १ जूननंतर सर्व शाळांना वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तके दिली जातील. मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगु आणि उर्दू या सर्व माध्यमाचे मिळून हजार ६२० विद्यार्थ्यांना ४ लाख ४० हजार ५८१ पाठ्यपुस्तकांचे वाटप त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी, मान्यवर व पालकांच्या हस्ते केले जाणार आहे.
त्यादिवशी मुलांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. शाळांची स्वच्छता करणे, वर्गाची सजावट करणे, तसेच मुलांचे स्वागत वाजत गाजत करणे, यासह गुलाब पुष्प देऊन विविध रंगांचे फुगे उडवून आणि मिठाई देऊन करण्यात येणार आहे. याची तयारी करण्यासाठी शिक्षकांना दोन दिवस आधीच शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना प्रभारी प्रशासनाधिकारी पंडित यांनी केल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments